Saturday, June 29, 2024

‘विक्रम’ चित्रपटाची दुसऱ्या आठवड्यात देखील यशस्वी घौडदौड, केली तब्बल ‘इतक्या’ कोटींची कमाई

सध्या थिएटरमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यातील कमल हसनचा (kamal hassan)’विक्रम’ (vikram)  चित्रपट बॉक्स ऑफिसवर राज करत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले आहेत आणि तरीही तो चांगला चालत आहे. अपेक्षेप्रमाणे अनेक ‘विक्रम’ने मोडले आहेत आणि या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. ‘विक्रम’ सोबतच अक्षय कुमारचा (akshay kumar) ‘सम्राट पृथ्वीराज‘ (samrat pruthviraj) आणि आदिवी शेषचा (adivi shesh) ‘मेजर’ देखील थिएटरमध्ये दाखल झाला. अक्षयचा तो कब हा चित्रपट थिएटरमधून बंद झाला. ‘विक्रम’मुळे ‘सम्राट पृथ्वीराज’लाही त्रास झाल्याचे मानले जाते.

तामिळनाडूतील ‘विक्रम’चे कलेक्शन अप्रतिम आहे. माध्यमातील वृत्तानुसार या चित्रपटाने तामिळनाडूमध्ये १४२.२५ कोटींची कमाई केली आहे. येत्या वीकेंडमध्ये त्याचे कलेक्शन आणखी वाढू शकते. ‘विक्रम’ने दुसऱ्या आठवड्यात तामिळनाडूमध्ये ४४.२५ कोटींची कमाई केली आहे. राज्यातील ४० कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिलाच चित्रपट आहे. यापूर्वी ‘बाहुबली २’ ने ३८.१० कोटींची कमाई केली होती.

‘विक्रम’चे एकूण कलेक्शन आतापर्यंत २३५.५० कोटींवर पोहोचले आहे. लवकरच तो २५० कोटी क्लबमध्ये सामील होणार आहे. ‘विक्रम’ने पहिल्या आठवड्यात १६४ कोटींचे कलेक्शन केले होते. दुसऱ्या आठवड्याच्या शुक्रवारी ११ कोटी, शनिवारी १७ कोटी, रविवारी १८.५० कोटी, सोमवारी ७.५० कोटी, मंगळवारी ६.७५ कोटी, बुधवारी ५.७५ कोटी आणि गुरुवारी ५ कोटींची कमाई केली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

 

हे देखील वाचा