Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘डान्स आणि एक्शन सीन करु नकोस…’ ऋतिक रोशनला डॉक्टरांनी दिला सल्ला, अभिनेत्याचे उत्तर ऐकून कराल कौतुक

अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या त्याच्या आगामी ‘विक्रम वेधा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.हृतिकचा हा चित्रपट याच नावाच्या साऊथच्या चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर येत असताना हृतिक रोशन त्याचे जोरदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. नुकताच तो या चित्रपटाच्या गाण्याच्या लाँच कार्यक्रमात पोहोचला. यादरम्यान त्याने पडद्यावर पुनरागमन केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यादरम्यान हृतिक रोशनने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

‘विक्रम वेध’मध्ये हृतिक रोशनचा एक्शन अवतार दिसणार आहे. याआधीही हृतिक रोशनने ‘क्रिश’, ‘धूम’ आणि ‘वॉर’सह अनेक चित्रपटांमध्ये अॅक्शनचा प्रसार केला आहे. पण, एक वेळ अशी आली जेव्हा डॉक्टरांनी त्याला चित्रपटात अॅक्शन सीन न करण्याचा सल्ला दिला. मात्र, हृतिक रोशनने आपल्या ठाम इराद्याने डॉक्टरांना चुकीचे सिद्ध केले. नुकतेच खुद्द हृतिक रोशनने हे सांगितले आहे.

हृतिक रोशनने सांगितले की, ‘कहो ना प्यार है’ चित्रपटापूर्वी डॉक्टरांनी सांगितले होते की, डान्स आणि एक्शन चित्रपट करण्याच्या बाबतीत माझी तब्येत ठीक नाही. हृतिक पुढे म्हणाला, ‘मी डॉक्टरांचे बोलणे एक आव्हान म्हणून घेतले आणि असे चित्रपट करण्यासाठी माझ्या तब्येतीची काळजी घ्यायला सुरुवात केली. 25 चित्रपटांमध्ये डान्स करणं, एक्शन करणं आणि ते संवाद बोलणं हे माझ्यासाठी स्वप्नासारखं आहे.

विक्रम वेध बद्दल बोलायचे तर, या एक्शन-थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले आहे आणि त्यांनी चित्रपटाचे लेखनही केले आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात हृतिक रोशनसोबत सैफ अली खानही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, ‘विक्रम वेध’ हा चित्रपट जगभरातील 100 हून अधिक देशांमध्ये रिलीज होत आहे. हा चित्रपट 2017 च्या तमिळ भाषेतील हिट ‘विक्रम वेधा’ चा रिमेक आहे, ज्यात आर. माधवन आणि विजय सेतुपती यांनी अभिनय केला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा – ‘तुला दोन आई आहेत…’, म्हणत अली असगरच्या मुलांची उडवली होती खिल्ली, किस्सा ऐकून तुम्हीही व्हाल भावूक
परी म्हणू की, सुंदरा! जिनिलियाचे क्यूट फोटो पाहाच
प्रिया आनंदने ‘फुकरे’ चित्रपटातून मिळवली ओळख, ‘या’ व्यक्तीशी करायचे होते लग्न

हे देखील वाचा