Friday, December 8, 2023

प्रिया आनंदने ‘फुकरे’ चित्रपटातून मिळवली ओळख, ‘या’ व्यक्तीशी करायचे होते लग्न

‘फुकरे’ आणि ‘फुकरे 2’ मध्ये झळकणारी अभिनेत्री प्रिया आनंद हिने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते ती नेहमी आपले फोटो शेअर करत असते. 17 सप्टेंबरला ही अभिनेत्री आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर या खास दिवशी प्रियाच्या जीवनातील काही खास माहिती जाणून घेऊया.

अभिनेत्री प्रिया आनंद (priya Anand)हिने बॉलिवूडमध्ये ‘फुकरे’ आणि ‘फुकरे 2′(fukrey and fukrey2) मध्ये काम केल्याने तिची ओळख निर्माण झाली. तिने आपल्या करिअरची सुरुवात करिअरची सुरुवात श्रीदेवी (Sridevi) सोबत ‘इंग्लिश विंग्लिश'(English Vinglish) या चित्रपटातून केली होती. तिने या चित्रपटामध्ये साहाय्यक भूमिका निभावली होती. यानंतर ती ‘रंगरेज’आणि ‘फुकरे’ सारख्या चित्रपटामध्ये दिसली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Anand (@priyawajanand)

अमेरिकेमध्ये चांगला अभ्यास करुन तिने मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचे ठरवले होते. मात्र, यानंतर तिला अभिनय क्षेत्रात साउथ इंडस्ट्रीमध्ये काम मिळाले आणि तिने 2009 साली ‘वामन'(Vaman) चित्रपटातून आपल्या करिअरची सुुरुवात केली. यानंतर तिने तेलुगू चित्रपटामध्ये डेब्यू केला आणि याशिवाय तिने हिंदी, मल्ल्याळम आणि कन्नड चित्रपटामध्येही काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Anand (@priyawajanand)

प्रिया आपल्या अभिनयामुळेच नाही तर आपल्या वक्तव्यामुळेही चर्चेत असते. तिने एका मुलाखतीदरम्यान आपल्या वैयक्तिक आयुष्यावरही खूप उघड करुन सांगितले आहे. तिने सांगितले होते की, तिला बलात्कार आरोपी नित्यानंदवर प्रेम जडले होते. आणि तिला नित्यानंद स्वामी(Nityanand Swami) सोबत लग्नही करायचे होते. भले त्याच्यावर कितीही आरोप केेले किंवा कितीही लोक त्याच्या विरोधात असले, तरीही मला काहीच फरक पडत नाही. शेवटी प्रिया आनंदला दिवंगत अभिनेता पुनीत कुमार याच्यासोबत चित्रपट ‘जेम्स’ मध्ये पाहायला मिळाली होती. या अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रामध्ये आपले 13 वर्ष पुर्ण केले आहे.

हेही वाचा-
‘सुभेदार’ चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी मानले सुप्रिया सुळेंचे आभार; म्हणाले, ‘मावळ्यांबरोबर कायम…’
मालिकेत काम करून निया शर्माने कमावले नाव, हॉटनेसबाबत बॉलिवूड अभिनेत्रींना देखील टाकले माग

हे देखील वाचा