12Th Fail फेम विक्रांत मेस्सी (VIkrant messy) गेल्या काही दिवसांपासून तो चांगलाच चर्चेत आला आहे. त्याच्या अभिनयामुळे चर्चेत असणारा विक्रांत सध्या वैयक्तिक जीवनामुळं चर्चेत आला आहे. त्याने एका मुलाखती दरम्यान कुटुंबाविषयी भाष्य केले. जे चर्चेत आलं आहे.
‘Unfiltered by Samdish’ या यूट्यूब पॉडकास्टमध्ये बोलताना विकीने मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्यांने कुटुंबियांबद्दल मोठा खुलासा केला आहे. यावेळी त्याने त्याच्या मोठ्या भावावर भाष्य केलं आहे. विक्रांत म्हणाला, माझ्या मोठ्या भावाने इस्लाम धर्म स्विकारला आहे. त्यांच नाव मोईन आहे. त्याने कुटुंबाच्या परवानगीनेच धर्मपरिवर्तन केले आहे. माझ्या घरच्यांनी याबाबतीत कधीच आडकाठी केली नाही. त्याने वयाच्या १७ व्या वर्षी इस्लाम धर्म स्वीकारला. इतकेच नव्हे तर अनेकदा घरी वाद होतात हेदेखील विक्रांतने यावेळी सांगितले.
तसेच तो पुढे म्हणाला, माझी आई शीख आहे तर माझे वडील ख्रिश्चन आहेत. महिन्यातून दोन वेळा माझे वडील चर्चमध्ये जातात. लहानपणापासूनच मी धर्म या गोष्टीवरुन होणारे वाद मी फार जवळून पाहिले आहेत. भावाने केलेल्या धर्मपरिवर्तनासंदर्भात अनेक नातेवाईकांनी माझ्या वडिलांना प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तुम्ही अशी कशी परवानगी देऊ शकता? असे अनेक प्रश्न विचारले होते.
पण वडिलांनी चोख उत्तर दिले. ”तो माझा मुलगा आहे आणि तो केवळ मला उत्तर द्यायला बांधील आहे अन् त्याला त्याच्या आयुष्यात कोणताही निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आहे.” वडिलांच्या याचं विचारांमुळे माझ्या विचारांमध्येही बराच फरक पडला, माझ्यामते धर्म हा मानवनिर्मितच आहे.”
विक्रांतने शीतल ठाकूरशी लग्नगाठ बांधली अन् नुकतंच त्यांनी शीतल गरोदर असल्याची बातमी सोशल मीडियावरुन शेअर केली. आपल्या मुलावरही आपण तसेच संस्कार करणार असल्याचा खुलासाही विक्रांतने या मुलाखतीमध्ये केला. पण ज्या गोष्टी या भारतीय संस्कृतीशी जोडलेल्या आहेत अन् ज्या आपण लहानपणापासून बघत आलो आहोत त्या आपण पाळायलाच हव्यात असंही विक्रांतने स्पष्ट केलं.
‘12th fail’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. या चित्रपटाला यंदाचे बरेच फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले. सामान्य प्रेक्षकांपासून बऱ्याच सेलिब्रिटीजपर्यंत कित्येकांनी विक्रांतच्या अभिनयाचे आणि त्याच्या या चित्रपटाचे कौतुकही केले. चित्रपटक्षेत्रात येण्याआधी विक्रांतने बऱ्याच टीव्ही सिरियल्समध्ये काम केलं ज्यातून त्याला लोकप्रियेता मिळाली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अंकिता लोखंडेची सासू दिसली महाराणीच्या गेटअपमध्ये; अभिनेत्रीने केली पूजा
अॅडमिट कार्डवर सनी लिओनीचा फोटो; ‘त्या’ तरुणानं दिलं स्पष्टीकरण, मला माहिती नाही…