Wednesday, July 3, 2024

बिग बॉसच्या घरात असणाऱ्या शमिता शेट्टीला विंदू दारा सिंगने दिला पाठिंबा म्हणाला, ‘ती खूप स्ट्रॉंग…’

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण असलेली अभिनेत्री शमिता शेट्टी सध्या बिग बॉस ओटीटीमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. शमिताने देखील बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत अभिनयात पदार्पण केले, मात्र तिला अपेक्षित यश मिळाले नाही. सध्या सुरु असलेला राज कुंद्रा अश्लील सिनेमानिर्मिती प्रकरणात शमिता शेट्टीचे देखील नाव आले आहे. या प्रकरणामुळे शमिता पुन्हा प्रकाशझोतात आली, शिवाय या सर्व कौटुंबिक संकटांच्या काळातही तिने बिग बॉसमध्ये प्रवेश केला, यावरून तिला सोशल मीडियावर ट्रॉल देखील करण्यात आले होते.

शमिता पहिल्यांदाच बिग बॉसमध्ये आली असे नाही, यापूर्वी देखील तिने ‘बिग बॉस ३’मध्ये स्पर्धक म्हणून स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. मात्र अचानक वैयक्तिक कारणामुळे तिला हा शो सोडावा लागला.  त्यानंतर आता ‘बिग बॉस’ ओटीटीचे नवे पर्व सुरु झाले आणि शमिता पुन्हा यात स्पर्धक म्हणून सामील झाली.

Photo Courtesy: Instagram/shamitashetty_official

 

शमिताने बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात सहभाग घेतला होता. त्यावेळी तिच्यासोबत स्पर्धक म्हणून आणि बिग बॉस ३ चा विजेता असणाऱ्या अभिनेता विंदू दारा सिंगने शमिताचे कौतुक केले आहे. आधीच्या बिग बॉस घरात असणारी शमिता आणि आता बिग बॉसमध्ये दिसणाऱ्या शमितामध्ये मोठा फरक पडला आहे. त्याने सांगितले की, “आम्ही सोबत सहभाग घेतलेल्या बिग बॉसच्या त्या पर्वाला आता १० वर्ष झाले आहे. मात्र आता बिग बॉसमध्ये दिसणारी शमिता अधिक स्ट्रॉग झाली आहे. ती सर्वांचा धीराने सामना करत आहे.”

पुढे विंदू दारा सिंग म्हणाला, “शमिताने सर्वच चांगले पद्धतीने हाताळत असताना तिने दिव्यासोबत केलेली मैत्री मला पटली नाही. पाठीत खंजीर खुपसणाऱ्या व्यक्तीसोबत तुम्ही मैत्री करू शकत नाही, आणि हीच चूक शमिताने केली आहे. शमिताने या घरात तिचे मित्र विचारपूर्वक निवडले पाहिजे. ”

विंदू दारा सिंगने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, मात्र काही काळापासून तो हिंदी चित्रपटांमधून गायब आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

खरंच की काय! जेह देखील आहे ‘लाल सिंग चड्ढा’च्या रोमँटिक गाण्याचा भाग? करीनाने केला खुलासा

कौतुकास्पद! पर्वतारोही उमा सिंगने सोनू सूदला केला विजय समर्पित; म्हणाला, ‘खऱ्या आयुष्यातील हीरोला पहिल्यांदाच भेटलो आणि…’

सैफ अली खानने भाड्याने दिले त्याचे फॉर्च्युन हाइट्समधील घर; ‘इतके’ पैसे मिळूनही दरवर्षी वाढत जाणार रेंट

 

 

हे देखील वाचा