Saturday, June 29, 2024

मराठी सिनेसृष्टीतही लवकरच उडणार लग्नाचा बार, विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे ‘या’ दिवशी बांधणार लगीनगाठ

सध्या बॉलिवूडमध्ये रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टच्या (Alia Bhatt) लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. अगदी अवघ्या काही तासांवर हा विवाह सोहळा येऊन ठेपलेला असताना मराठी सिनेसृष्टीतही आता लवकरच लग्नाचा बार उडणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही चर्चा दुसऱ्या कोणाची नसून विराजस कुलकर्णी ( viragas kulkarni) आणि शिवानी रांगोळे (Shivani Rangole) यांच्या विवाहाची आहे. त्यांचा साखरपुडा आधीच पार पडला असल्याने त्यांच्या चाहत्यांना ते कधी लग्न करणार याची उत्सुकता लागली होती. त्यांच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून या लग्नाची तारीखही ठरली आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, मराठी मनोरंजन क्षेत्रात अनेक दिवसांपासून विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. याआधी त्यांच्या प्रेमप्रकरणाच्याही बातम्या समोर आल्या होत्या. मात्र त्यांनी प्रत्येकवेळी आपल्या या नात्याचा उघडपणे खुलासा केला होता. आता त्यांच्या या लवस्टोरीचा लग्नाच्या मांडपात गोड शेवट होणार आहे. या लग्नासाठी 7 मे रोजीचा मुहूर्त निवडण्यात आला आहे. येत्या ७ मे रोजी विराजस आणि शिवानी यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. पुण्यात हा विवाहसोहळा पार पडणार असून त्यांच्या लग्नाला काही खास व्यक्ती आणि मित्रमंडळींना आमंत्रित करण्यात आलं आहे.

दरम्यान विराजस हा मराठी चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णीचा मुलगा आहे. विराजसने  अभिनय जगतात आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेतील त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. या मालिकेतील भूमिकेनेच विराजसला घराघरात लोकप्रियता मिळवून दिली. त्याचप्रमाणे  अभिनेत्री शिवानीनेही ‘सांग तु आहेस ना’ या मालिकेतून आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. यामध्ये तिने सिद्धार्थ चांदेकर सोबत काम केले आहे. मालिकेतील तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांनीही कौतुक केले होते. अभिनेता विराजसने ‘हॉर्न ओके प्लिज’ या मालिकेतही काम केले आहे. आता या विवाह सोहळ्याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा