×

‘संपूर्ण भारताला घेरणारे वादळ’, विजय देवरकोंडाच्या आगामी चित्रपटाच्या गाण्याचा टिझर प्रदर्शित

साउथ इंडस्ट्रीतील सुपरहिट अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Devarakonda)  सध्या त्याच्या आगामी ‘लाइगर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहे आणि चाहत्यांमध्येही या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आज विजय देवराकोंडा त्याचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी निर्मात्यांनी विजय देवरकोंडाच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. ती म्हणजे ‘लाइगर’ चित्रपटातील पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये विजयची दमदार शैली पाहून चाहते खूश झाले आहेत. आता विजयच्या चाहत्यांना या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता लागली आहे. 

या गाण्याचा टीझर सोनी इंडिया म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आला असून तो 1 मिनिट 46 सेकंदाचा आहे. या टीझरमध्ये विजय देवरकोंडाची स्टाईल खूपच दमदार आहे. टीझरची सुरुवात वस्तीमधून होते त्यानंतर कलाकार दोरीवर उडी मारताना दिसतात आणि त्यानंतर विजय देवरकोंडा आपल्या भन्नाट शैलीत धावताना दिसतो. गाण्याच्या टीझरमध्ये त्याच्या दमदार अ‍ॅक्शनची झलक पाहायला मिळते, जी चाहत्यांना नक्कीच आवडली आहे. करण जोहरने. करण जोहरने , ‘हे ते वादळ आहे जे संपूर्ण भारताला घेरणार आहे, #LigerHunt सादर करत आहे! विजय देवराकोंडा, हे वर्ष तुमचे आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा. अशा शब्दात त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

विजय देवरकोंडाच्या ‘लाइगर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु असे मानले जात आहे की हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होऊ शकतो. चित्रपटात विजय देवरकोंडा व्यतिरिक्त अनन्या पांडे, माइक टायसन, रम्या कृष्णन, रोनित रॉय आणि मकरंद देशपांडे दिसणार आहेत. हा चित्रपट जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केला आहे आणि धर्मा प्रॉडक्शनच्या अंतर्गत करण जोहर निर्मित आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post