Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड ‘द बिग बुल’ पाहून युजरने अभिषेक बच्चनच्या अभिनयाला म्हटले ‘थर्ड क्लास’, त्यानेही दिले गांधीगिरी स्टाईलमध्ये प्रत्युत्तर

‘द बिग बुल’ पाहून युजरने अभिषेक बच्चनच्या अभिनयाला म्हटले ‘थर्ड क्लास’, त्यानेही दिले गांधीगिरी स्टाईलमध्ये प्रत्युत्तर

चित्रपट चांगला असो किंवा नसो, त्या चित्रपटातील कलाकारांचा आधीचा अभिनय लक्षात ठेवून, लोक त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंग करताना दिसतात. त्या चित्रपटातील कलाकारदेखील ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देताना नेहमी दिसतात.

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘द बिग बुल’ हा चित्रपट गुरुवारी (८ एप्रिल) प्रदर्शित झाला आहे. डिस्ने हॉटस्टारवर रिलीझ झालेला हा चित्रपट, हर्षद मेहता यांनी केलेल्या १९९२च्या स्टॉक मार्केट घोटाळ्यावर आधारित आहे. अभिषेकची ही भूमिका सोशल मीडियावर बरेच लोक पसंत करत आहेत. परंतु असेही काही लोक आहेत, ज्यांनी त्याच्या अभिनयाच्या कौशल्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अभिषेक बच्चन याच्या अभिनयाला एका यूजरने ट्वीट करत ‘थर्ड क्लास’ म्हटले. यानंतर अभिषेकने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

अभिषेक बच्चन सोशल मीडियावर सक्रिय असून, ट्रोल करणाऱ्या युजरच्या कमेंटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहे. अलीकडेच एका युजरने लिहिले की, ‘नेहमीप्रमाणेचं अभिषेक बच्चनचा थर्ड क्लास अभिनय, खराब स्क्रिप्ट आणि निरुपयोगी चित्रपटामुळे तुम्ही निराश नाही केले. १९९२ घोटाळा यापेक्षा खूप चांगला होता.’

यूजरच्या या कमेंटला अभिषेक बच्चनने गांधीगिरी स्टाईलमध्ये प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला, ‘हे माणसा, मी तुम्हाला निराश केले नाही, म्हणून मी आनंदी आहे. आपला वेळ काढून चित्रपट पाहिल्याबद्दल धन्यवाद.

‘द बिग बुल’मध्ये अभिषेक बच्चनसोबत निकिता दत्ता आणि इलियाना डिक्रूझ मुख्य भूमिकेत दिसले आहेत. १९९२ मध्ये भारतीय शेअर बाजाराच्या सर्वात मोठ्या घोटाळ्याचा आरोपी हर्षद मेहतावर आधारित ‘द बिग बुल’ची कथा आहे.

हर्षदने बरेच आर्थिक गुन्हे केले होते, त्यामुळे त्याला अटकही झाली. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण आणि आनंद पंडित यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला होता, ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लहान मुलांना बर्गर वाटून तरुणाने जिंकली सर्वांची मने, ‘बारिश की जाए’ गाण्यावरही लावले ठुमके; गायक बी प्राककडून व्हिडिओ शेअर

-‘ब्रोकन बट ब्युटीफुल!’ सिद्धार्थ शुक्लाच्या किसिंग सीनला चाहत्यांची पसंती; मात्र शहनाजचे चाहते झाले निराश

-‘मी परफेक्ट नाहीये’, लूकबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर अनुष्काने दिले होते प्रत्युत्तर

हे देखील वाचा