बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान पुन्हा एकदा आई- वडील बनले आहेत. पतौडी कुटुंबात आणखी एका पाहुण्याचे आगमन झाले आहे. आज (२१ फेब्रुवारी) रोजी बेबोने म्हणजेच करीनाने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात मुलाला जन्म दिला. मात्र, करीना आणि सैफ यांनी अद्यापही याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. त्यांच्या मुलाच्या बातमीने त्यांचे चाहते खूप खुश झाले आहेत. यादरम्यान करीनाचा पहिला मुलगा तैमुर अली खान आता मोठा भाऊ झाला आहे. अशातच त्याच्यावर मीम्स बनवले जात असून ते सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
सोशल मीडियावरील तैमुरला ट्रोल करत एका युजरने म्हटले की, ‘लोकप्रियता संकटात सापडली आहे.’
Congratulations #KareenaKapoorKhan and #SaifAliKhan for baby boy..
Meanwhile Taimur : ???? pic.twitter.com/rqAYujnpjK
— ℝℝ (@Being_tigerrr) February 21, 2021
दुसऱ्या एका युजरने अक्षय कुमारचा ‘हेरा फेरी’ चित्रपटातील बाबू भाईचा डायलॉग वापरत म्हटले की, ‘बहुत गलत हुआ रे बाबा.’
https://twitter.com/ud998/status/1363364422324916228
याचसोबत अनेक युजर्स तैमुरचे मीम्स बनवून सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
KareenaKapoor SaifAliKhan with son Taimur welcome a new member in family 'baby boy'
Le Taimur :- pic.twitter.com/0rrekH1q4N— फूलचंद त्रिपाठी (@_munna_bhaiyaji) February 21, 2021
Taimur to his new born sibling :- pic.twitter.com/JV417fxb4K
— फूलचंद त्रिपाठी (@_munna_bhaiyaji) February 21, 2021
सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानीच्या पोस्टनुसार करीना कपूरने सकाळी 4:45 वाजता तिच्या दुसर्या मुलाला जन्म दिला. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सैफ आणि करीनाचे चाहते त्यांचे खूप अभिनंदन करत आहेत.
खरं तर सैफला पहिली पत्नी अमृता सिंगकडून दोन अपत्य आहेत. त्यांचे नाव सारा अली खान आणि इब्राहिम खान असे आहे. यानंतर करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी 2012 मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर चार वर्षांनी, 2016 मध्ये करीनाने तैमुरला जन्म दिला होता.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…