Friday, July 5, 2024

अक्षयने सांगितला पहिल्या डेटींगचा मजेदार किस्सा! गर्लफ्रेंड सोडून गेल्याचे कारण ऐकूण तुम्हीही पोट धरुन हसाल

बॉलिवूडमध्ये सौगंध या चित्रपटातून अक्षय कुमार यांनी पदार्पण केले आहेत. केसरी, मिशन मंगल,हाऊसफुल यासारखे हिट चित्रपट त्यांच्या नावे आहेत. अक्षय कुमार यांनी द कपिल शर्मा शो मध्ये त्यांच्या पहिल्या डेटिंगचा एक मजेदार किस्सा सांगितला.

कॉमेडियन कपिल शर्माचा शो ‘द कपिल शर्मा ‘येथे बॉलिवूडच्या अनेक सेलेब्सनी त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशनसह मनोरंजनासाठी भेट दिली आहे. यामुळे हा कार्यक्रम खूप मजेदार होतो. शोमध्ये कॉमेडी व्यतिरिक्त प्रेक्षकांना कलाकारांच्या मजेदार कथा ऐकायला मिळायच्या.

हा शो काही काळ बंद आहे. आणि पुन्हा सुरू होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. या शोचे बरेच जुने व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या शोमध्ये अक्षय कुमार यांनी एकदा डेटिंग रिलेशनशीपबद्दल एक किस्सा सांगितला होता.

इतर सेलिब्रिटींप्रमाणेच अक्षय कुमार हे ही आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये पोहोचले होते. अक्षय कुमार यांच्यासोबत अभिनेता रितेश देशमुख सेटवर होता. तो आपल्या ‘हाऊसफुल ४’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेला होता.

यावेळी कपिल शर्माने त्यांना विचारले की, ‘मुलीने तुला काय सांगून नाकारले होते? यावर उत्तर देताना अक्षयने त्याच्या पहिल्या डेटिंगशी संबंधित एक किस्सा सांगितला. अक्षय म्हणाले, “मी थोडा लाजाळू होतो, आणि मुलीची ईच्छा होती की,मी तिच्या खांद्यावर हात ठेवून तिचे चुंबन घ्यावे. जे मी करू नाही, शकलो आणि ती मला सोडून गेली.

अक्षय यांचे हे बोलणे ऐकून, तेथे उपस्थित प्रत्येकजण हसायला लागतो. रितेश देशमुख म्हणतो, ‘या कथेवर कोण विश्वास ठेवेल, मला सांगा?’ रितेश असे बोलताच प्रत्येकजण मोठ्याने हसण्यास सुरुवात करताना दिसतात.

यावर कपिल पुन्हा अक्षयला विचारतो, ‘या घटनेतून तुम्हाला काय शिकायला मिळालं?’ असं म्हणून अक्षय म्हणाले की, “यानंतर मी पूर्णपणे यातुन बाहेर पडलो.” अक्षयच्या या गोष्टी ऐकून तिथे उपस्थित सर्वजण जोरात हसू लागले. येत्या काही दिवसात बेल बॉटम तसेच तसेच बच्चन पांडे या चित्रपटातून अक्षय कुमार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

हे देखील वाचा