अनन्या पांडे (Ananya pandey) ही बॉलिवूडची सध्याच्या घडीची आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने तिने अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनन्या तिच्या अभिनयाइतकीच सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या तिचा असाच एक व्हिडिओ चर्चेत आला आहे, ज्यामुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.
याबाबतीत सध्या सोशल मीडियावर अनन्या पांडेचा व्हिडिओ समोर आला आहे. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ती सहभागी झाली होती. यादरम्यान तिने काळ्या रंगाचा आउटफिट घातला होता, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. पण अनन्याला तिच्या लूक आणि उंचीवरून चांगलेच ट्रोल करण्यात आले. मात्र, यावेळी अनन्याने पापाराझींसाठी पोजही दिली आणि आगामी ‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटाविषयी त्यांच्याशी चर्चा केली. वास्तविक, व्हायरल होत असलेल्या अनन्याच्या या व्हिडिओमध्ये ती गरजेपेक्षा जास्त उंच दिसत आहे. त्यामुळेच ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.
View this post on Instagram
पापाराझी वायरल भयानीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अनन्या काळ्या पोशाखात दिसत आहे. तिने गळ्यात पेंडेंट आणि नेकपीस घातला आहे. अनन्या सुंदर दिसत असली तरी नेटकऱ्यांनी तिला तिच्या उंचीबद्दल ट्रोल केले. काहींनी तिला सर्कसमध्ये काम करायला सांगितलं तर काहींनी तिला लंबू म्हटलं. एका यूजरने व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहिले की, “हाहाहा सर्कस वाला आदमी” तर आणखी एका युजरने अनन्या पांडेला ‘स्ट्रीट लाइट’ म्हटले आहे. अनेकांनी तिला “कदाचित सर्कसमध्ये काम करण्याची तयारी करत आहे.” असे म्हणत खिल्ली उडवली आहे.
त्याचबरोबर अनेकांनी तिला हा तर 5जीचा टॉवर असल्याचे म्हणले आहे. पापाराझी विरल भयानी यांनीही आपल्या पोस्टमध्ये अनन्या पांडेच्या टाचांचा उल्लेख केला आहे. पण ते किती इंच होते, याचा उल्लेख नाही. व्हिडिओमध्ये या टाचांमुळे अनन्या खूपच उंच दिसत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा- ‘या’ कारणामुळे मुनमुनच्या मनात होती पुरुषांबद्दल घृणा; वेलेंटाइन्स डेच्या दिवशीच तिला बॉयफ्रेंडने केली होती मारहाण
TMKOC | मुनमुन दत्ताच्या ठुमक्यांनी घातला धुमाकूळ, ‘बबीता जी’च्या अदांवर भुरळले चाहते
लता दीदींना होती महागडे दागिने अन् आलिशान गाड्यांची आवड; मागे ठेवलीये 350 कोटींहून अधिकची संपत्ती, ज्याचे वारस…