प्रसिद्ध व्हिडिओ जॉकी, टीव्ही व्यक्तिमत्व आणि ‘बिग बॉस १५ मधील करण कुंद्राची एक्स गर्लफ्रेंड अनुषा दांडेकरने शनिवारी (२९ जानेवारी) संध्याकाळी इंटरनेटचे तापमान वाढवले. तिने इंस्टाग्रामवर तिचा बिकिनी व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अनुषा दांडेकर बिकिनी परिधान करून पूलमध्ये उतरताना दिसत आहे. मात्र, अनुषाचा हा व्हिडिओ थ्रोबॅक व्हिडिओ असल्याचं दिसत आहे. ज्यामध्ये ती दुबईतील स्विमिंग पूलमध्ये जाताना दिसत आहे. अनुषाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये अमेरिकन गर्ल ग्रुप डेस्टिनीज चाइल्डचे एक बुटलेगीस गाणे बॅकग्राउंडमध्ये वाजत आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना ४० वर्षीय अनुषा दांडेकरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मला वाटते तुम्ही तयार आहात… #filterfreeculture सर्व मार्गाने!” व्हिडिओच्या कॅप्शनप्रमाणे काही इमोटिकॉन्सही पोस्ट करण्यात आले आहेत. थॉन्ग बिकिनीमध्ये अनुषाला पाहिल्यानंतर आता युजर्स स्वतःला कमेंट करण्यापासून रोखू शकत नाहीत. अनेक युजर्स तिच्या बोल्ड लूकचे कौतुक करत आहेत. तर अनेकजण तिच्यावर निशाणा साधत आहेत.
व्हिडिओमध्ये अनुषा दांडेकरचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. अनुषा अनेकदा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील झलक सोशल मीडियावर शेअर करत असते. मग ती सुट्टीतील असो किंवा तिच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत पार्टी करत असो, अनुषा तिच्या आयुष्यातील झलक चाहत्यांसह शेअर करण्यापासून कधीच मागे हटत नाही.
अलीकडेच अनुषाने तिचा ४० वा वाढदिवस तिचे कुटुंब आणि जवळच्या मित्रांसोबत एका सुंदर ठिकाणी साजरा केला. मॉडेलने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावेळी अनुषासोबत तिची बहीण शिबानी दांडेकर आणि जवळची मैत्रीण रिया चक्रवर्तीही होती.
नुकतीच अनुषा दांडेकर ‘बिग बॉस १५’ मध्ये तिच्या एन्ट्रीच्या बातम्यांमुळे चर्चेत होती. ‘बिग बॉस १५’ आता अंतिम टप्प्यात आला आहे. तिचा एक्स बॉयफ्रेंड करण कुंद्रा देखील स्पर्धकांपैकी एक आहे. ज्याने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अनुषा आणि करणचे गेल्या वर्षी ब्रेकअप झाले होते. यानंतर अभिनेत्रीने करणवर फसवणूक केल्याचा आरोपही केला होता. दोघांच्या विभक्त झाल्याची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. अभिनेत्याने सांगितले की, दोघांमधील सर्व काही परस्पर संमतीने संपले.
हेही वाचा :