Thursday, April 18, 2024

रानू मंडलनेही गायलं लोकप्रिय ‘कच्चा बादाम’ गाणं, युजर्सने धरलं डोकं आणि म्हणाले…

सोशल मीडिया आजच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढत जाणारे माध्यम आहे. या माध्यमाने अनेक सामान्य लोकांना देखील स्टार बनवत त्यांना लोकप्रियता मिळवून दिली आहे. आज मनोरंजनविश्वात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना सोशल मीडियावर अमाप लोकप्रियता मिळाली आणि मग ते मनोरंजनविश्वात आले आणि त्यांनी त्यांचे करिअर घडवले. सोशल मीडिया सेन्सेशन बनलेल्या आणि नंतर बॉलिवूडमध्ये आलेल्या कलाकारांपैकी एक सर्वात गाजलेले नाव म्हणजे रानू मंडल (Ranu Mondal) होय.

सध्या सोशल मीडियावर ‘कच्चा बादाम’ हे बंगाली गाणे गाजत आहे. हे गाणे खूप गाजत आहे. या गाण्यावर डान्स करताना अनेक सेलेब्स आणि सामान्य लोकांनी त्यांचे व्हिडिओ शेअर केले आहेत. ‘कच्चा बादाम’ हे गाणे पश्चिम बंगालमधील शेंगदाणा विक्रेत्या भुबन बद्यकरने गायले आहे, जे खूप पसंत केले जात आहे. आता हे गाणे रानू मंडलने तिच्या स्टाईलमध्ये गायले आहे, ज्यामुळे युजर्सने डोके धरले आहे. रानूचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती ‘कच्चा बादाम’ गाताना दिसत आहे.

युजर्सने केलं रानू मंडलला ट्रोल
रानू मंडल हे गाणे गाऊन नुसती चर्चेत आली नाही, तर तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे. हा व्हिडिओ समोर येताच अनेकांनी तिची खिल्ली उडवली. एका युजरने लिहिले की, “ओम शांती बदाम.” दुसऱ्याने लिहिले, “हे काय आहे?” आणखी एकाने कमेंट केली की, “कच्चे बादाम नसतात, कच्चा बदनाम असतात.” आणखी एका युजरने लिहिले की, “हिमेश रेशमिया पुन्हा पुन्हा चुकणार नाही.” त्याचवेळी काही युजर्स म्हणाले की, “तू राहू दे. तुझ्याकडून नाही होऊ शकत.”

व्हिडिओ होतोय व्हायरल
याशिवाय युजर्सनी रानू मंडलच्या व्हिडिओवर हसणारे इमोजी शेअर केले आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत ५६ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. पण सर्वाधिक कमेंट्स रानूला ट्रोल करणाऱ्या आहेत. याआधी रानू मंडलने सहदेव दिरदोचे ‘बचपन का प्यार’ हे गाणे गायले होते. त्यावेळीही तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.

एका रात्रीत झाली स्टार
काही वर्षांपूर्वी रानू मंडलचा रेल्वे स्टेशनवर ‘एक प्यार का नगमा है’ गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी चाहत्यांना रानूचा आवाज खूप आवडला होता. यानंतर तिला एका रियॅलिटी सिंगिंग शोमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. जिथे गायक आणि संगीतकार हिमेश रेशमियाने तिला आपल्या चित्रपटात गाण्यासाठी एक गाणे दिले होते. यानंतर हिमेशसोबत रानू मंडलने ‘तेरी मेरी कहानी’ या गाण्याला आवाज दिला जो खूप लोकप्रिय झाला.

हेही वाचा :

हे देखील वाचा