Sunday, January 18, 2026
Home बॉलीवूड ‘सीटी मार’ गाण्यावर थिरकली ‘बजरंगी भाईजान’ फेम मुन्नी, चाहत्यांनी दर्शवली पसंती; पाहा व्हिडिओ

‘सीटी मार’ गाण्यावर थिरकली ‘बजरंगी भाईजान’ फेम मुन्नी, चाहत्यांनी दर्शवली पसंती; पाहा व्हिडिओ

ईदच्या निमित्ताने गुरुवारी (१३ मे) सलमान खानचा ‘राधेः योर मोस्ट वाँटेड भाई’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची २ गाणी ‘सीटी मार’ आणि टायटल ट्रॅक ‘राधे’ यापूर्वीच प्रदर्शित झाली होती. तसेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती. आता ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील ‘मुन्नी’ नावाची व्यक्तिरेखा साकारणारी बालकलाकार हर्षाली मल्होत्राने ‘सीटी मार’ गाण्यावर डान्स केला आहे.

हर्षालीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती सलमान खानचा चित्रपट ‘राधे’ मधील’ ‘सीटी मार’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती गाण्याच्या सर्व हुक स्टेप्स एका सुंदर स्टाईलमध्ये करत आहे.

हर्षालीने तिचा डान्स व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये ‘सीटी मार’ असे लिहिले आहे. हा डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांनी खूप पसंत केला आहे. एका सोशल मीडिया युजरने हर्षालीच्या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, ‘अपकमिंग हिरोईन.’ त्यासोबतच दुसऱ्या एकाने लिहिले की,  ‘थोडे हावभाव कमी आहेत, बाकी सर्व काही ठीक आहे.’ एकाने तर विचारले, ‘तू मुन्नीची भूमिका केली होती ना.’ तसेच कोणी ‘सुंदर’, तर कोणी ‘खूप छान’ म्हणत प्रशंसा केली आहे.

या अगोदरही अभिनेत्री करीना कपूरच्या ‘तुझे भर लूं अपनी आंखों में’ गाण्यावर हर्षाली मल्होत्राने मस्त डान्स केला होता. हर्षालीचा हा व्हिडिओही जोरदार व्हायरल झाला होता.

हर्षाली मल्होत्रा ​​’बजरंगी भाईजान’ चित्रपटाच्या यशानंतर मुन्नी याच नावाने प्रसिद्ध झाली आहे. या चित्रपटानंतर तिने अर्जुन रामपालबरोबर ‘नास्तिक’मध्ये काम केले आहे. अल्पावधीत हर्षाली मल्होत्रा ​​सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बाबो!! इजिप्तच्या सुपरस्टारसोबत रोमान्स करताना दिसली उर्वशी रौतेला, पहिला इंटरनॅशनल म्युझिक व्हिडिओ झाला रिलीझ

-जमलंय म्हणायचं! सुगंधा मिश्राने केला लता दीदींची मिमिक्री करतानाचा व्हिडिओ शेअर, सांगितला भोसले होण्यापर्यंतचा प्रवास

-‘तेव्हा खिसा रिकामा असायचा, पण…’, म्हणत कपिल शर्माने शेअर केला २३ वर्ष जुना फोटो, सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

हे देखील वाचा