Sunday, July 14, 2024

संपली प्रतीक्षा! ‘पुष्पा: द रूल’मधील अल्लू अर्जुनचा खास लूक आला समोर

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन(Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना(Rashmika Mandaana) यांच्या ‘पुष्पा-द राईज’ या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बकळ कमाई करत अनेक नवा रेकॉर्ड स्थापित केलं आहेत. पुष्पा-द राईज या चित्रपटाने चाहत्याला वेड लावलं आहे. या चित्रपटाचे डायलॉग आणि गाणी सतत लोकांच्या तोंडातून ऐकायला मिळतात. चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर आता प्रेक्षकांना चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता लागून आहे. त्यातचं आता ‘पुष्पा 2’ची शूटिंग सुरु झाली आहे.

प्रसिद्ध पुष्पा फ्रँचायझीच्या पुढील चित्रपट ‘पुष्पा: द रुल’च्या सेटवरील पहिला फोटो समोर आला आहे. चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर मिरोस्लाव कुबा ब्रोझेक यांनी अभिनेता अल्लू अर्जुनसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. चित्रपटाच्या सेटवरील हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

अल्लू अर्जुन ‘पुष्पा: द राइज’पासून पॅन इंडियाचा स्टार बनला आहे. त्याच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाचीही लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. भाग 2 मध्ये देखील, अभिनेता पुष्पा राजची भूमिका पुन्हा साकारणार आहे. तसेच रश्मिका मंदान्ना पुन्हा एकदा श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघांव्यतिरिक्त, फहद फासिल देखील या चित्रपटात भंवर सिंग शेखावतची भूमिका पुन्हा साकारणार आहे.

सध्या चाहते चित्रपटाच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि दिवसेंदिवस लोकांची उत्सुकता वाढत आहे. अलीकडेच सिनेमॅटोग्राफरने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अभिनेता धमाकेदार स्टाईलमध्ये दिसत आहे. फोटोतील अभिनेत्याचा लूक चाहत्यांना खूप आवडतो. लोक या फोटोवर कमेंट करून अभिनेत्याचे कौतुक करत आहेत.

‘पुष्पा : द राइज’च्या यशानंतर आता सर्वांच्या नजरा चित्रपटाच्या दुसऱ्या भागाकडे लागल्या आहेत. दिग्दर्शक सुकुमार यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या दुसऱ्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा त्याचवेळी, काही अहवालांवर विश्वास ठेवला तर अल्लू अर्जुन त्याच्या प्रीक्वलसाठी मिळालेल्या रकमेच्या दुप्पट मानधन घेत आहे. पुष्पा सिक्वेलसाठी उल्लू अर्जुनची मानधन सुमारे 85 कोटी रुपये आहे. जी तेलुगू चित्रपट उद्योगातील एक नवीन विक्रम आहे. माध्यमाच्या वृत्तानुसार, या चित्रपटात ‘श्रीवल्ली’ची भूमिका साकारणारी रश्मिका मंदान्नाचा मृत्यू होणार असल्याचे बोलले जात आहे.

‘पुष्पा: द रूल’ या सिनेमाची निर्मिती 500 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात येणार आहे. निर्माते या सिनेमाच्या प्रमोशनसाठी 500 कोटी खर्च करणार आहेत. हा सिनेमा 10 भाषांमध्ये रिलीज होणार असल्याचे म्हटले जात आहे. आता या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याने प्रेक्षक ‘पुष्पा: द रूल’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच सिनेमागृहात ‘पुष्पा: द रूल’ हा सिनेमा धमाका करणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

दु:खद! गंभीर आजारनंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, कलाविश्वावर शोककळा
उर्फी जावेद पुन्हा एक्स बॉयफ्रेंडच्या प्रेमात? म्हणाली,’जुन्या गोष्टी विसरलो…’

हे देखील वाचा