Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड ‘तो’ व्हिडिओ पाहून एकता कपूरचाही सुटलाय थरकाप! भयावह व्हिडिओ शेअर करत म्हणाली…

‘तो’ व्हिडिओ पाहून एकता कपूरचाही सुटलाय थरकाप! भयावह व्हिडिओ शेअर करत म्हणाली…

चित्रपट आणि टीव्ही मालिका निर्माती एकता कपूर, ही नेहमी प्रेक्षकांना तिच्या सुपरनॅचरल शो आणि चित्रपटांद्वारे घाबरवत असते. मात्र, नुकतेच तिने असे काहीतरी पाहिले आहे, ज्यामुळे आता ती स्वतः बरीच घाबरली आहे. ही भीती तिने तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर व्यक्त केली आहे.

वास्तविक सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक विचित्र प्राणी रस्त्यावरून चालताना दिसत आहे. हा व्हिडिओ झारखंडमधील हजारीबागचा असल्याचे सांगितले जात आहे.

एकता कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि बर्‍याचदा ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते. अलीकडेच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक विचित्र प्राणी रस्त्यावर उघडपणे फिरताना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर काही युजर्स त्याला एलियन, भूत आणि झोंबी असेही संबोधत आहेत. हा व्हिडिओ पाहून, एकताही भयभीत झाल्याचे दिसत आहे. एकताने हा व्हिडिओ शेअर करत, कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “जे लोक एकटे झोपतात, त्यांच्यासाठी हे अतिशय भीतीदायक आहे.”

झारखंडच्या हजारीबागमध्ये, एका विचित्र व्यक्तीचा हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे. रस्त्यावर फिरतानाची एक विचित्र आकृती दर्शविणारा, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. एकताच्या या पोस्टवर कमेंट करून, काही युजर्स त्यांची भीती व्यक्त करत आहेत. तर त्याच वेळी, बरेच युजर्सला याला कॅमेराचा विशेष प्रभाव आणि व्हिडिओ बनवणाऱ्याची मस्ती असल्याचे म्हणत आहेत.

एकताबद्दल बोलायचे झाले, तर याआधी तिने ‘बडे अच्छे लगते हैं’ या शोला १० वर्षे पूर्ण झाल्यामुळे, तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ही मालिका ३० मे २०११ रोजी सुरू झाली होती, तर १० जुलै २०१४ पर्यंत चालली होती. तसेच, प्रेक्षकांकडून या मालिकेला भरभरून प्रेम मिळाले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

 

-विराटच्या लाईव्ह सेशनमध्ये अनुष्काची एन्ट्री; म्हणाली ‘माझे हेडफोन्स कुठे ठेवलेत?’ त्यानेही दिले भन्नाट प्रत्युत्तर

हे देखील वाचा