कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमधील हिजाबवरून सुरू असलेला वाद देशभर चर्चेचा विषय ठरला आहे. शुक्रवारी (११ फेब्रुवारी) उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. अंतरिम आदेश हा मुस्लीम मुलींशी भेदभाव करणारा असल्याचे सांगून तो त्वरित थांबविण्याची मागणी करण्यात आली. यावर सरन्यायाधीश एनव्ही रमना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणाला राजकीय आणि धार्मिक बनवू नये, असे सांगत तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. स्थानिक समस्या राष्ट्रीय बनवू नका. हा न्यायालयाचा विषय होता, मात्र बॉलिवूड स्टार आमिर खान आणि सलमान खान यांच्याबाबत सोशल मीडियावर दावा केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टचे सत्य काय आहे ते जाणून घेऊया.
काय आहे सलमान-आमिरच्या पोस्टचे सत्य?
हिजाब वाद प्रकरणी मुस्कान खान नावाच्या मुलीचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये मुलगी कॉलेजमध्ये हिजाब घालून ‘अल्लाह हू अकबर’चा नारा लावताना दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही युजर्सने मुस्कानच्या समर्थनार्थ धाडसाचे कौतुक केले. तर काहींनी हिजाब घालून कॉलेजमध्ये आल्याबद्दल टीका केली. दरम्यान, सोशल मीडियावर बॉलिवूड स्टार आमिर खान (Amir Khan) आणि सलमान खानसह (Salman Khan) तुर्की सरकार मुस्कान खानला ५ कोटी रुपये देणार असल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट्स आल्या.
आमिर-सलमानची व्हायरल पोस्ट आहे खोटी
माध्यमांतील वृत्तानुसार, ‘फॅक्टली’ने आपल्या संशोधनात दावा केला आहे की, तुर्की सरकारने मुस्कान खानबाबत असे कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. ज्यामध्ये पुरस्काराबाबत चर्चा आहे. तसेच त्यांच्या वेबसाईटवर अशी कोणतीही प्रेस रिलीझ जारी करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर आमिर खान आणि सलमान खान यांनी हिजाबच्या वादावर आतापर्यंत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली बातमी खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जानेवारीमध्ये उडुपीच्या ए कॉलेजमधील काही विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्याबद्दल वर्गात प्रवेश नाकारण्यात आला होता. या प्रकरणाबाबत एका विद्यार्थिनीने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हिजाब घालून वर्गात जाण्याची परवानगी मागितली होती.
हेही वाचा –
- जेव्हा राजकुमार यांनी डान्स करताना उडवली होती गोविंदाची मस्करी, पुढे झाले असे की…
- लता मंगेशकर यांच्या आठवणीने अभिनेते धर्मेंद्र झाले भावुक, म्हणाले ‘त्यांना एकटेपणापासून पळून…’
- भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा सोनम कपूरवर भडकले, अभिनेत्रीने हिजाबची शीख पगडीशी केली तुलना