Saturday, June 29, 2024

लाखात एक! ए.आर. रहमानच्या गाण्यावर चिमुकलीने मिसळला आईच्या सुरात सूर; पाहा हा गोंडस व्हिडिओ

कोरोना व्हायरसच्या काळात जास्तीत जास्त लोक घरीच वेळ घालवत आहेत. केवळ सेलिब्रिटीच नव्हे, तर सर्वसामान्य लोकही या दिवसात आपल्या छंदाचा आनंद घेताना दिसतात. एका आई-मुलीनेही असेच काही करून पाहिले आणि त्यांचा हा छोटा प्रयत्न सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. आई आणि मुलगी एकत्र गाणे गातानाचा हा व्हिडिओ वारंवार पाहिला जात आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी खूपच गोंडस अंदाजात, आपल्या आईच्या सुरात सुर मिसळताना दिसत आहे.

अंजना मदाथिल नावाच्या एका महिलेने, आपल्या मुलीसह हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. सुमारे 49 सेकंदांच्या या क्लिपमध्ये, अंजना गिटार वाजवित गाणे गात आहे. तिची मुलगी जवळ बसली आहे आणि ती सुद्धा पूर्ण हावभावासह गात आहे. अंजना मदाथिलने हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करत लिहिले की, “गिटारसोबत हा माझा पहिला प्रयत्न. मला सहा महिन्यांचा कालावधी लागला.”

छोट्या मुलीने ज्या प्रकारे हे गाणे गायले आहे, त्याला युजर्सने खूपच पसंत केले आहे. सोशल मीडिया युजर्सला हे स्ट्रेस बस्टर म्हणजेच, तणावाच्या वातावरणात आरामदायी वाटत आहे. प्रत्येकजण एकमेकांना हा गोंडस व्हिडिओ पाहण्याचा सल्ला देत आहेत. अंजना मदाथिल आणि तिच्या मुलीला यूजर्स प्रेम आणि आशीर्वाद देत आहेत.

फेसबुकवर 18 एप्रिल रोजी शेअर केलेल्या या व्हिडिओवर, आतापर्यंत 11,000 हून अधिक लाईक्स आले असून जवळपास 5000 वेळा हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. यावर एका युजरने लिहिले, “मुलगी खरोखरच एक रॉकस्टार आहे. छान गाणे गायले.” दुसर्‍या युजरने लिहिले, “कृपया छोट्या मुलीचे आणखी व्हिडिओ शेअर करा.” आई-मुलीचा हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर झाल्यानंतर तो ट्विटरवरही शेअर करण्यात आला.

अभिनेत्री अमृता सुभाषनेही हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत ‘हे खूप सुंदर आहे. आम्ही सर्व एकमेकांसोबत आहोत,’ असे लिहिले आहे.

लाखो मने जिंकणाऱ्या या व्हिडिओमध्ये आई- मुलगी, तमाशा या चित्रपटाचे ‘अगर तुम साथ हो’ हे गाणे गात आहेत. हे गाणे अलका याग्निक आणि अरिजित सिंग यांनी गायले आहे. ए. आर. रहमान यांनी गाण्याला संगीतबद्ध केले आहे. तसेच, ‘तमाशा’ मध्ये रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते. (viral social little girl singing agar tum saath ho song with her mother video viral)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सुशांत सिंग आत्म’हत्ये प्रकरणी हनी सिंगच माेठं वक्तव्य; म्हणाला, ‘अभिनेत्याचा मृत्यू…’

रोमियो-ज्युलिएटमध्ये, दिग्दर्शकाने फसवणूक करून मिळवले नग्न दृश्य, कलाकारांनी गुन्हा दाखल करत केली करोडोंची मागणी

हे देखील वाचा