Sunday, December 8, 2024
Home अन्य बंदूक घेऊन सपना चौधरी बनली ‘गुंडी’, गाण्याचा टिझर रिलीझ

बंदूक घेऊन सपना चौधरी बनली ‘गुंडी’, गाण्याचा टिझर रिलीझ

सपना नेहमी तिच्या डान्सने प्रेक्षकांना भुरळ घालत असते. तिच्या डान्सचे लाखो चाहते आहेत. अशात ती आता एक हरियाणवी गाणे घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

हरियाणवी देसी क्वीन सपना चौधरीचे नवे गाणे ‘गुंडी’वर जोरदार चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच सपना चौधरीचा या गाण्यातील लूक रिलीझ झाला होता. आता या गाण्याचा दमदार टीझरही समोर आला आहे. ज्यामध्ये सपनाची देसी पण ‘धाकड’ स्टाईल पाहायला मिळाली.

रिलीझ झालेला टिझर या गाण्याची संपूर्ण कहाणी सांगत आहे. गावातल्या एका साध्या कुटुंबातील मुलगी गुंडांना धडा शिकवण्यासाठी कशाप्रकारे आपल्या हातात शस्त्र घेते, हे टिझरमध्ये सांगण्यात आले आहे.

सपना चौधरीने काही काळापूर्वीच या गाण्याचा टिझर सोशल मीडियावर शेअर केला होता. या टिझरमध्ये सपना हातात बंदूक घेऊन संपूर्ण गावात फिरताना दिसली. टिझर खूपच दमदार आहे. सपना चौधरीचे हे नवीन हरियाणवी गाणे आंतरराष्ट्रीय महिला दिनी, म्हणजेच 8 मार्च रोजी रिलीझ होणार आहे. जे यूट्यूब चॅनेल ड्रीम्स एंटरटेनमेंट हरियाणवीवर अपलोड केले जाईल.

हे गाणे अशा महिलांवर आधारित आहे, ज्यांना समाजात अन्याय सहन करावा लागतो आणि तरीही याविरूद्ध त्या आवाज उठवू शकत नाहीत. या गाण्यात सपना चौधरी खास स्टाईलमध्ये दिसत आहे. गाण्याचा टिझर जरी समोर आला असेल, तरी संगीत कसे असेल, गीत कसे असेल, याबद्दल कोणताही खुलासा झालेला नाही. मात्र, सपनाचा लूक खूप चर्चेत आहे आणि यावरूनच गाणे किती धमाकेदार असेल याचा अंदाज बांधता येऊ शकतो.

हे गाणे राज मावर आणि सिमरन बुमराह यांनी गायले आहे. गाण्याचे लिरिक्स संजीत सरोहा यांनी लिहले असून, गाण्याला संगीत राज म्युझिकने दिले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-केजीएफ स्टार यश प्रेमळ बापाच्या भूमिकेत; बाप- लेकाच्या व्हिडिओला मिळतंय चाहत्यांकडून अफाट प्रेम

-पद्मिनी कोल्हापुरेच्या मुलाच्या लग्नात श्रद्धाचे जोरदार ठुमके, व्हिडिओ पाहून थिरकतील तुमचेही पाय

-‘मी त्याला अनेकदा मरताना पाहिलंय…’, सुशांतच्या आठवणीत दिग्दर्शक भावुक, व्हिडिओ केला शेअर

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा