Sunday, October 26, 2025
Home अन्य शिमरी स्कर्टमध्ये ‘देसी क्वीन’चा खास अंदाज! वेस्टर्न लूकमध्येही दिसतेय गजब

शिमरी स्कर्टमध्ये ‘देसी क्वीन’चा खास अंदाज! वेस्टर्न लूकमध्येही दिसतेय गजब

हरियाणवी डान्सर सपना चौधरी चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्याची कोणतीही संधी सोडत नाही. आई झाल्यापासून तर ती अधिकच चर्चेत आली आहे. आई झाल्यानंतर, ती काही काळ सोशल मीडियापासून दूर राहिली. परंतु नंतर ती जबरदस्त अंदाजात परतली. सपना चौधरीने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच बोल्ड अवतारात दिसत आहे.

या फोटोंमध्ये सपना व्हाइट टॉप आणि शिमरी स्कर्टमध्ये दिसत आहे. सपना वेस्टर्न लूकमध्ये अतिशय शोभून दिसत आहे. यात तिची अप्रतिम अदा चाहत्यांना वेड लावायला पुरेशी आहे. सपनाचा हा लूक तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. हरियाणवी डान्स क्वीनचे चाहते तिच्या लूकवर कमेंट करत आहेत आणि तिचे कौतुकही करत आहेत.

सपना चौधरीच्या लूक्सचे कौतुक होत असतानाच, ट्रोलर्सही तिच्यावर निशाणा साधून आहेत. पण, ट्रोलर्सला कसे उत्तर द्यायचे हे तिला चांगलेच ठाऊक आहे. ही अदाकारा आपल्या जोरदार आवाजाने नेहमीच ट्रोलर्सचे तोंड बंद करते.

यापूर्वीही सपनाच्या पारंपारिक लूकमधील काही फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला होता. तिने इंस्टाग्राम अकाऊंटवर लेहंग्यामधील काही फोटो शेअर केले होते. हिरव्या रंगाच्या लेहंग्यामध्ये सपना खूपच सुंदर दिसत होती. विशेष म्हणजे फोटोसोबत लिहिलेल्या कॅप्शनने तिच्या चाहत्यांची मने जिंकली. तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते, “अहो, मला यशाच्या शिखरावर पोहोचताना पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत, पण माझ्या पायाचे फोड कोणीही पाहिले नाहीत.”

सपना चौधरी तिच्या डान्समुळे अधिक प्रसिद्ध आहे. मात्र, आई झाल्यानंतरही सपना खूप उत्साहात दिसत आहे. ती आता सोशल मीडियावर पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. एवढेच नव्हे तर ती बॅक टू बॅक तिचे नवीन म्युझिक व्हिडिओही घेऊन येत आहे. जे म्युझिक इंडस्ट्रीमध्ये जोरदार धमाल करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ही तर जलपरी’, आलिया भट्टचा अंडरवॉटर बिकिनी फोटो पाहून चाहत्यांची झक्कास प्रतिक्रिया

-अभिनेत्री पूजा बेदीच्या ‘या’ कंडोम जाहिरातीने उभा ठाकला होता वाद, दूरदर्शनवर केली होती बंद, पाहा बोल्ड फोटो

-निया शर्माचे बाथटबमधील फोटो करतायत सोशलवर धमाल, प्रेक्षकांचा मिळतोय भरभरून प्रतिसाद

हे देखील वाचा