प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा त्यांच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखले जातात. ते सोशल मीडियावर खूप सक्रिय राहतात. अनेक विषयांवर आपले विचार उघडपणे व्यक्त केल्यामुळे, अनेकदा ते वादात देखील सापडले आहेत. अलीकडेच राम गोपाल वर्मा आणि अभिनेत्री इनाया सुल्तानाचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याला प्रतिसाद देत, राम यांनी ट्वीट केले आणि म्हटले होते की, “हा मी नाही.” तर गुरुवारी (२६ ऑगस्ट) स्वत: इनाया सुल्तानाने राम गोपाल वर्मासोबत तिच्या डान्सचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, यामध्ये तिने राम यांनाही टॅग केले आहे.
इनाया सुल्तानाने तिच्या ट्विटर हँडलवरून कथित व्हायरल व्हिडिओच्या डान्स सीक्वेन्ससारखाच एक दुसरा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत इनाया सुल्तानाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मी माझा आणि राम गोपाल वर्मा यांचा हा डान्स व्हिडिओ अधिकृतपणे शेअर करत आहे.” (viral social viral video inaya sultana shares a new video of her dancing with ram gopal varma)
I officially share this video of mine and @RGVzoomin pic.twitter.com/gr80fFARnK
— Inaya Sultana (@inaya_sultana) August 25, 2021
याआधी, राम गोपाल वर्मा आणि इनाया सुल्ताना यांचा या डान्स आणि गेटअपमधील जो व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यावर राम यांनी ट्वीट केले होते. ते म्हणाले होते की, हा व्हिडिओ त्यांचा आणि इनायाचा नाही. त्यांनी या व्हिडिओसह एक अतिशय रोचक कॅप्शन लिहिले आहे. त्यांनी लिहिले होते, “मला स्पष्ट करायचे आहे की, या व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती मी नाही आणि लाल कपड्यांमध्ये दिसणारी मुलगी इनाया सुल्ताना नाही.” यानंतर त्यांनी असेही लिहिले की, “मी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची शपथ घेऊन सांगत आहे.”
I once again want to clarify that the guy in this video is not me and the Girl in Red is not @inaya_sultana and I swear this on American President JOE BIDEN pic.twitter.com/K8nNera7Rc
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) August 22, 2021
राम गोपाल वर्मा १५ मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च करून बरेच चर्चेत आले. त्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे नाव ‘स्पार्क ओटीटी’ आहे. एका वृत्तवाहिनीशी केलेल्या विशेष संभाषणात, जेव्हा राम गोपाल वर्मा यांना विचारण्यात आले की, त्यांनी स्वतःचे ओटीटी प्लॅटफॉर्म का सुरू केले आहे? तेव्हा दिग्दर्शक म्हणाले की, त्यांना ज्या प्रकारचे चित्रपट बनवायला आवडतात, त्याला कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची त्यांची इच्छा आहे. यासाठी ते त्यांचे स्वतःचे ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन आले आहेत. अलीकडेच, राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘डेंजरस’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. असे म्हटले जाते की, हा चित्रपट भारतातील पहिला लेस्बियन क्राइम-थ्रिलर चित्रपट आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-खतरों के खिलाडी: उडालीय सर्वांचीच झोप, नेमकं कशाला घाबरलेत शोचे हे निडर स्पर्धक
-नुसरत जहाँ आई झाल्यानंतर, तिच्यापासून विभक्त झालेल्या पतीने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आमच्यात…’