Friday, March 14, 2025
Home नक्की वाचा अमृता फडणवीसांचा व्हायरल Video तुम्ही पाहिला असेलच… पण त्यांच्यासोबत नाचणारा तो आहे तरी कोण?

अमृता फडणवीसांचा व्हायरल Video तुम्ही पाहिला असेलच… पण त्यांच्यासोबत नाचणारा तो आहे तरी कोण?

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या सतत वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असतात. नुकतंच त्यांचं नवीन गाणं मूड बना लिया है गाणं प्रदर्शित झालं असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. काही दिवसातच गाण्याने सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे. नुकतंच अमृताजींचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सोशल मीडिया इनफ्लूएंसर सोबत त्यांनी त्यांच्या नवीन गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.

अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) सध्या आपल्या ‘मूड बना लिया’ (Mood Bana liya) लिया या गाण्यासाठी खूपच चर्चेत आहेत. सतत त्यांचे व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियाव व्हायरल होत असातता. अशातच त्यांचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अमृता यांनी सोशल मीडिया स्टार रियाज अलीसोबत ‘ मैने मूड बना लिया है’ या त्यांच्या अल्बम साँगवर डान्स केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपसून अमृता फडणवीस त्यांच्या नवीन गाण्यासाठी खूपच चर्चेत आहेत. पहिल्यांदाच त्या पंजाबी गाण्याद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्यांचा वेस्टर्न लूक देखिल चाहत्यांना भूरळ घालत आहे. अमृतांजीच्या गाण्याने सोशल मीडियावर तर राडा घातला आहे. अशातच त्यांच्या या नवीन व्हिडिओने त्यांनी चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे. व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

View this post on Instagram

 

काही दिवसांपसूर्वी त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन गाण्याचा एक फोटो आणि काही पंजाबी ओळी लिहित ट्वीट शेअर करत नवीन गाण्याची माहिती दिली होती. त्यांनी ट्वीट शेअर केल्यापासू चाहत्यांमध्ये गाण्याची उत्सुकता लागली होती.  अमृताजींच गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर प्रेक्षकांनी देखिल चांगाल प्रतिसाद दिला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आखों मे बसी हो पर दूर हो कहीं! जान्हवीच्या ट्रेडिशनल लूकवर नेटरी फिदा…
बड़ी हसरत से तुमको देखता है ये ज़माना! प्राजक्ता माळीचे नवीन फोटोशूट

हे देखील वाचा