Friday, July 5, 2024

आनंदाची बातमी! विराट- अनुष्काने मुलीसोबतचा पहिला फोटो केला शेअर, सांगितले मुलीचे नाव

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने ११ जानेवारी २०२१ रोजी मुलीला जन्म दिला होता. यानंतर आता अनुष्काने आपल्या मुलीचा पहिला फोटो शेअर करत चाहत्यांना आपल्या मुलीचे नाव सांगितले आहे.

अनुष्का शर्माने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत सांगितले आहे की, तिने आणि विराटने आपल्या मुलीचे नाव ‘वामिका’ ठेवले आहे.

अनुष्का शर्माने आपल्या मुलीचा पहिला फोटो शेअर करत लिहिले की, “आम्ही प्रेम आणि कृतज्ञतापूर्वक आयुष्य जगत आलो आहोत. परंतु या लहान वामिकाने हे एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. अश्रू, हसू, आनंद, चिंता या भावना काही मिनिटांत जाणवतात. आमची झोप उडाली आहे. परंतु आमचे हृदय पूर्ण भरलेले आहे. तुमच्या शुभेच्छा, प्रार्थना आणि चांगल्या ऊर्जेसाठी धन्यवाद.”

विराट कोहलीने केली होते मुलीच्या आगमनाची घोषणा

अनुष्का शर्माच्या या पोस्टवर चाहत्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत अनेकजण शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. याव्यतिरिक्त मुलीसोबतच जोडप्यालाही आशीर्वाद देत आहेत. विराट आणि अनुष्काच्या या मुलीचा जन्म मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात झाला होता. विराटने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत शेअर केली होती. विराटच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींकडून खूप शुभेच्छा मिळाल्या होत्या.

विराटने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, “आम्हा दोघांनाही हे सांगताना खूप आनंद होत आहे की, आज दुपारी आम्हाला मुलगी झाली आहे. आम्ही तुमच्या प्रेम आणि शुभेच्छांसाठी मनापासून आभारी आहोत. अनुष्का आणि मुलगी दोघेही सुखरूप आहेत. हे आमचे भाग्य आहे की, आम्हाला आयुष्याचा हा अनुभव घेण्याची संधी मिळाली. आम्हाला माहिती आहे की, तुम्ही नक्की समजून घ्याल की, आता आपल्या सर्वांना थोडीशी प्रायव्हसी हवी असेल.”

२०१७ मध्ये झाले होते विराट आणि अनुष्काचे लग्न

विराट आणि अनुष्का यांनी अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर ११ डिसेंबर २०१७ रोजी इटलीमध्ये लग्न केले होते. खासगी समारंभात झालेले हे लग्न चांगलेच चर्चेचे विषय ठरले होते. ऑगस्ट २०२० मध्ये विराट आणि अनुष्काने घोषणा केली होती की, ते लवकरच आई-वडील होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

अनुष्काबरोबरच्या पहिल्याच भेटीत विराटने जोक मारला अन् तो फसला, पुढे अनुष्काने…

याला म्हणतात ‘तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला येणे’, तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या घरात राहणार विराट-अनुष्काची कन्या; जाणून घ्या

डॉक्टर-डॉक्टर! तब्बल ९१ वय असलेल्या डॉक्टरांनी केली अनुष्काची डिलिव्हरी, पाहा कसा आहे त्यांचा मनोरंजक प्रवास

हे देखील वाचा