×

अनुष्काबरोबरच्या पहिल्याच भेटीत विराटने जोक मारला अन् तो फसला, पुढे अनुष्काने…

क्रिकेट आणि बॉलिवूडमधल्या नात्याची परंपरा ही अनेक वर्षांची आहे. काही क्रिकेटपटूंनी तर बॉलिवूडच्या अभिनेत्रींसोबत लग्नगाठ देखील बांधली. ही परंपरा अगदी शर्मिला टागोर आणि टायगर पतौडी यांच्यापासून ते अलीकडच्या झहीर खान आणि सागरिका घाटगे पर्यंत अविरत चालू आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली २०१७ साली यांनी लग्न केले. त्यांच्या चाहत्यांनी त्यांना ‘विरुष्का’ हे नाव देखील दिले आहे. सध्या विराट आणि अनुष्का यांचे नाते आयुष्याच्या एका सुंदर आणि गोड वळणावर आहे. अनुष्काने एका गोड मुलीला जन्म दिला आहे.

परंतू सांगितलं तर विश्वास बसणार नाही की क्रिकेटच्या मैदानावर विरूद्ध टीमचा घाम काढणारा आणि शतके ठोकणारा विराट अनुष्काला पहिल्यांदा भेटल्यावर नर्वस झाला होता. हँडसम विराट आणि सुंदर अनुष्का यांची पहिली भेट एका जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान झाली. विराट आणि अनुष्का एका शाम्पूच्या जाहिरातीमध्ये सोबत दिसणार होते. त्याच जाहिरातीच्या शूटिंगवेळी या दोघांची पहिली भेट झाली.

विराटने त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा एका मुलाखतीमध्ये सांगितला होता. तो म्हणाला, “आम्ही दोघे एका कंपनीच्या शॅम्पू जाहिरातीसाठी एकत्र भेटलो होतो. मी आधी कधीही कोणत्याच अभिनेत्रींसोबत काम केले नव्हते. सेटवर पोहचल्यावर मी अनुष्काला पाहिले, ती खूप कॉन्फिडन्ट दिसत होती. अनुष्काने त्यावेळी हिल्स घातल्या होत्या, त्यामुळे मी तिच्यासमोर बुटका दिसत होतो.

यावरून मी अनुष्काच्या समोर एक जोक मारला मात्र दुर्दैवाने तो जोक फसला आणि अनुष्का मला पाहून नि:शब्द झाली होती. मला तेव्हाची परिस्थिती जरा सामान्य करायची होती म्हणून मी जोक मारला, पण नेमकी झाले उलटे जोक मारल्यानंतर मी जास्तच नर्वस झालो, आणि परिस्थिती अजून वाईट झाली. त्यानंतर आम्ही ती जाहिरात शूट केली. मग आमच्या भेटी वाढू लागल्या आणि हळू हळू आम्हाला आम्ही प्रेमात पडलायची जाणीव झाली.

‘विरुष्का’ने अनेक वर्ष एकमेकांना डेट करत डिसेंबर २०१७ मध्ये इटलीमध्ये लग्न केले. लवकरच अनुष्का आणि विराट आई बाबा होणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post