Wednesday, July 3, 2024

विरुष्काच्या अध्यात्मिक ट्रीपमध्ये दिसला क्युट वामिकाचा खट्याळ अंदाज, व्हिडिओ झाला व्हायरल

बॉलिवूडमधील सर्वात क्युट कपल म्हणून अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे ओळखले जातात. क्रिकेट आणि मनोरंजन या दोन्ही क्षेत्रात त्यांचे तुफान फॅन्स आहेत. दोनवर्षापूर्वीच विराट आणि अनुष्का एका मुलीचे आईबाबा झाले. मात्र त्यांनी त्यांच्या मुलीला वामिकाला मीडिया आणि सर्वांपासून खूपच लांब ठेवले. या दोनवर्षात एकदाही वामिकाचा चेहरा त्यांनी दाखवला नाही. असे असले तरी वामिकाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, पण इथेही तिचा चेहरा समोर येत नाही.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Virushka Empire (@virushka_empire)

सध्या विराट आणि अनुष्का मथुरा आणि वृंदावन इथे असून, ते सध्या त्यांची अध्यात्मिक ट्रिप एन्जॉय करत आहे. या ट्रिपचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, यात वामिकाचा अतिशय मोहक नटखट अंदाज नेटकऱ्यांना पहायला मिळत आहे. यातलीच एका व्हिडिओमध्ये वामिका आई अनुष्काच्या मांडीवर बसलेली दिसत असून, मांडीवर बसल्या बसल्या तिची मस्ती चालू असल्याचे दिसत आहे. तिचा हा अंदाज नेटकऱ्यांना खूपच आवडत आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनुष्का आणि विराट देवदर्शन घेत आहे. नुकतीच त्यांनी बाबा नीम करोली यांच्या आश्रमला आणि प्रेमानंद गोविंद शरणजी महाराज यांच्या आश्रमला भेट दिली. अनुष्का आणि विराटला त्यांचे जीवन खासगी ठेवायला जास्त आवडते त्यासाठीच त्यांनी त्यांच्या या ट्रीपची माहिती कुठेही दिली नव्हती. तरीही आता सोहळा मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @virushka_always1801

या ट्रिप दरम्यान अनुष्का आणि विराट यांचा साधेपणा देखील सर्वाना पाहायला मिळाला. ते मान्द्रित कोणताही गाजावाजा न करता अगदी सध्या रूपात गेले. जमिनीवर बसून त्यांनी देवाचे दर्शन घेतले. त्याच्या या वागण्यावर देखील नेटकरी खुश आहे. याआधी त्यांनी नोव्हेंबरमध्ये उत्तराखंडचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी विविध मंदिरांना भेटी देऊन देवाचा आशीर्वाद घेतला.

अनुष्का शर्माच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती लवकरच स्पोर्ट्स ड्रामा असलेल्या ‘चकदा एक्सप्रेस’ सिनेमामध्ये दिसणार आहे. हा सिनेमा महिला क्रिकेटर असणाऱ्या झुलन गोस्वामीवर आधारित आहे. सिनेमाची शूटिंग पूर्ण झाली असून, हा सिनेमा थेट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मसकली गाण्याच्या रिमेकवर ए.आर रेहमान यांची नाराजी? म्हणाले, ‘मुळ गाणे बनवायला 365 दिवस…’

ए पळा पळा..! गायिकेने असा काही सुर छेडला की, माणसांसह कुत्र्या-मांजरांची झाली पळापळ, पाहा रेहमानने शेअर केलेला भन्नाट व्हिडिओ

हे देखील वाचा