Sunday, May 19, 2024

दुसऱ्यांदा मिळणार का ‘गुड न्यूज’?, सुट्टीवरून परतताच हॉस्पिटलमध्ये पोहोचले विराट कोहली आणि अनुष्का शर्मा

नुकतेच सोमवारी (१३ जून) विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सुट्टीवरून परतले आहेत. मात्र मायदेशी परतताच हे जोडपे मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात पोहोचले. त्यांना असं रुग्णालयात पाहून, त्यांचे चाहते दोघांबद्दल थोडे घाबरले होते. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच, चाहत्यांनी आपापले अंदाज बांधायला सुरुवात केली, तर काही चाहते विरुष्कासाठी चिंतेत आहेत. 

दुसऱ्यांदा मिळणार का ‘गुड न्यूज’?
हे ना आम्ही म्हणत आहोत, ना अंदाज लावत आहोत. खरं तर हा अंदाज सोशल मीडियावर युजर्सनी लावला आहे. विराट आणि अनुष्का हॉस्पिटलमध्ये जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, काही यूजर्सनी अनुष्का शर्मा पुन्हा प्रेग्नंट असल्याची अटकळ बांधायला सुरुवात केली. कोणी म्हणाले की, दुसरी गुड न्यूज येणार आहे, तर काही यूजर्स दोघांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. (virat kohli and anushka sharma reached kokilaben hospital)

नुकतंच सुट्टीवरून परतलं जोडपं
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली अलीकडेच मालदीवमध्ये सुट्टीवर गेले होते आणि आज सकाळी ते परतले देखील आहेत. मात्र परत येताच अनुष्का आणि विराट हॉस्पिटलमध्ये दिसले. अनुष्काने तिच्या मालदीवच्या व्हेकेशनचा एक छान फोटोही शेअर केला होता, ज्यावरून हे स्पष्ट झाले की दोघांनी या सुट्टीचा मनमुराद आनंद घेतला.

विराट सध्या कुटुंबासोबत मोकळेपणाने वेळ घालवत असताना, अनुष्का शर्मा तिच्या करिअरची दुसरी इनिंग सुरू करणार आहे. ‘चकदा एक्स्प्रेस’मधून अनुष्का ५ वर्षांनंतर पुनरागमन करणार आहे. २०१८ मध्ये, अनुष्का शर्मा शेवटची ‘झिरो’ या चित्रपटात दिसली होती, त्यानंतर तिने अभिनयातून ब्रेक घेतला, त्यावेळी ती कुटुंब आणि तिच्या प्रॉडक्शन हाऊसच्या कामात व्यस्त होती. मात्र, आता पुन्हा चित्रपटांमध्ये परतणार असलेल्या अनुष्काने प्रॉडक्शन हाऊसपासून स्वत:ला वेगळे केले आहे.

हे देखील वाचा