टी20 विश्वचषकामधील 2022 मध्ये लोकप्रिय क्रिकेटर विराट कोहली सध्या खूपच चर्चेत आहे. त्याने एवढ्या दिवस शांत राहून शेवटी विश्वचषकामध्ये आपल्या बॅटने आग ओकली होती, पूर्ण भारताला त्याने दिवाळी आगोदरच धमाकेदार स्पर्धा जिंकून खुश केले होते. विराट आपल्या खेळासोबतच वैयक्तीक आयुष्यातील लव्हस्टोरीमुळे देखिल अनेकदा चर्चेत आला होता, त्याने अनुष्का पुर्वी एका अभिनेत्रीला डेट केल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधान आले आहे.
भारताचा दमदार क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohali) सध्या विश्वचषकातील खेळीमुळे खूपच चर्चेत आला आहे. विराटने अनेक दिवसापासून डेट करत असलेली बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Aushka Sharma) हिच्यासोबत 2017 मध्ये लग्न केले. दोघांनाही एक मुलगी असून तिचे नाव वामिका ठेवले आहे. मात्र , सतत चर्चेत असणारा क्रिकेटर अनुष्कासोबत लग्न करण्यापूर्वी दुसऱ्याच अभिनेत्रीला डेट करत होता. त्यामुळे विराट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
विराट अनुष्कापूर्वी ब्राझीलची मॉडेल आणि अभिनेत्री इसाबेल लिट्टे (Isabel leite) हिला डेट करत होता. सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये विराट आणि इसाबेल एकत्र दिसत आहेत. हे दोघे 2012 ते 2014 पर्यत एकमेकांना डेट करत असतानाच्या काही फोटोंनी सोशल मीडियावर कहर केला आहे.

अभिनेता आमिर खान (Amir khan) याच्या ‘तलाश’ चित्रपटामधून इसाबेलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर अभिनेत्री बॉलिवूडच्या अनेक चित्रपटामध्येही झळकली होती, त्याशिवाय अभित्रीने अनेक जागहिरातीमध्येही काम केले आहे. इसाबेल साउथमध्येही ‘मिस्टर मजनु’, आणि ‘नरेंद्र’ सारख्या चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती.

अभिनेत्री इसाबेल हिने एका मुलाखतीदरम्यान विराट कोहली आणि तिच्या नात्याची कबूली दिली होती, तिने सांगितले की, “होय आम्ही एकमेकांना दोन वर्ष डेट केले आहे आता मात्र, आमचे नाते संपले आहे, पण तरीही आम्ही एकमेकांशी बोलतो.” असे बोलून तिने दोघांच्या नात्याला पुर्णविराम लावला होता. आता मात्र, अभिनेत्री ब्राझीलमध्ये आपल्या मुलीसोबत आरामाचे आयुष्य जगत आहे.
हेही वाचा-
–ब्रेकिंग! प्रसिद्ध गायकाला अटक; बलात्कार आणि फसवणुकीचे गंभीर आरोप
–ना शाहरुख, ना सलमान… भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता कोण? नाव ऐकून तुम्हाला बसेल धक्का










