Friday, November 22, 2024
Home कॅलेंडर Soo क्यूट ना..! सोशल मीडियावर व्हायरल होतोय ‘विरुष्का’च्या मुलीचा पहिला फोटो? तुम्हीही पाहा…

Soo क्यूट ना..! सोशल मीडियावर व्हायरल होतोय ‘विरुष्का’च्या मुलीचा पहिला फोटो? तुम्हीही पाहा…

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आता आई, बाबा झाले आहेत. अनुष्काने सोमवारी मुंबईत एका मुलीला जन्म दिला आहे. जेव्हा ही गोड बातमी सर्वाना समजली तसे अनुष्का आणि विराटवर शुभेच्छा आणि आशीर्वादाचा वर्षाव होत आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार, क्रिकेटर्स आणि या दोघांचे फॅन्स विराट, अनुष्काला भरभरून शुभेच्छा देत आहे. या बाळाचा फोटो पहाण्याची सर्वानाच खूप उत्सुकता आहे. यातच सोशल मीडियावर एका बाळाचा फोटो खूप वायरल होत असून, त्यात सांगितले जात आहे की, हा फोटो विराट, अनुष्काच्या मुलीचा आहे.

Virat Anushka
Virat Anushka

विराट कोहलीचा भाऊ विकास कोहलीने या दांपत्याला शुभेच्छा देत त्यांच्या बाळाचा वेलकम लिहिलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, आनंदाची लाट…घरात आली परी… असे लिहीत बाळाच्या पायांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

https://www.instagram.com/p/CJ5wWUJDfcs/?utm_source=ig_web_copy_link

मात्र, हा व्हिडिओ फक्त शुभेच्छा देण्यासाठी असून, ही विराट, अनुष्काच्या बाळाची खरी झलक नाहीये. या व्हिडिओची सत्यता समजल्यानंतरही हा व्हिडिओ खूप वायरल होत आहे. तर दुसरीकडे काही यूजर्सने बाळाचा फोटो शेयर करत ‘ते’ फोटोमधील बाळ विरूष्काचे असल्याचा दावा केला आहे. पण हे देखील साफ चुकीचे आहे.

विराट कोहलीची बहीण भावना कोहलीने देखील सोशल मीडिया अकाऊंटवर एक कॉमन फोटो शेयर करत लिहिले आहे की, ‘ तुझी आत्या खूप खुश आहे. सुंदर छोटी परी, विराट, अनुष्का तुम्हाला खूप शुभेच्छा.’

विराट आणि अनुष्काच्या मुलीचा पहिला फोटो बघण्यासाठी संपूर्ण जग खूप उत्सुक आहे. मात्र विराटने केलेल्या ट्विटनुसार वाटत नाही, विराट आणि अनुष्का लवकरच त्यांच्या मुलीचा फोटो लवकर जगासमोर आणतील. विराटने त्याच्या ट्विट मध्ये म्हटले होते की, “तुम्ही सर्व आमच्या खाजगी आयुष्याचा आदर राखाल.”

विराटने ही गोड बातमी देताना ट्विट केले की, “आम्हाला दोघांना सांगताना अत्याधिक आनंद होत आहे की, आज दुपारी आमच्या घरी एका गोंडस मुलीचा जन्म झाला आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद यासाठी आम्ही खरंच खूप आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी, दोघीही ठणठणीत आहेत. हे आमचे सौभाग्य आहे की आम्हाला आमच्या आयुष्यात ही अनमोल गोष्ट अनुभवता आली. तुम्ही सर्व आमच्या प्रायव्हसीचा नक्कीच आदर राखाल याबाबत खात्री आहे.”

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा