Wednesday, July 3, 2024

अभिनेत्री विशाखा सुभेदारच्या शिरपेचात मानाचा तुरा, राज्यपालांच्या हस्ते ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कारा’ने केले सन्मानित

विशाखा सुभेदार म्हणजे मराठीमधील हुशार, अभ्यासू आणि भारदस्त व्यक्तिमत्व. आपल्या विनोदी बुद्धीच्या जोरावर विशाखाने मराठी मनोरंजन विश्वात स्वतःचे नाव कोरले आहे. मराठीमधले अनेक कॉमेडी शो जिंकणाऱ्या विशाखाने आपल्या उत्तम विनोदी शैलीच्या आणि टायमिंगच्या जोरावर मराठी विनोदी कलाकारांच्या यादीत मुख्य स्थान मिळवले आहे. आपल्या शरीराचा न्यूनगंड कधीही न बाळगणाऱ्या विशाखाने केवळ प्रतिभेच्या आणि मेहनतीच्या जोरावर ओळख कमावली.

आज विशाखाच्या मेहनतीचे चीज झाले आहे. कारण विशाखाला ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. वेगवेगळ्या क्षेत्रातील १० कर्तृत्ववान स्त्रियांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र आणि गोवा राजचे राज्यपाल असणाऱ्या भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून विशाखाला हा पुरस्कार देण्यात आला.

या गौरवानंतर विशाखाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट आणि काही फोटो शेअर करत तिचा आनंद व्यक्त केला आहे. विशाखाने लिहिले, “प्रचंड आनंद झाला. आधी विश्वास बसत नव्हता, पण जेव्हा निमंत्रण पत्रिका हातात आली, तेव्हा खरं वाटलं. या पुरस्काराच्या निमित्तानं राजभवनात जाण्याचा योग आला. लेकाला बरोबर घेऊन गेले होते, नेमकं महेशला (पती) काम होत अन्यथा तो देखील आला असता. आईच्या डोळ्यातला आनंद, दादा वाहिनीच्या डोळ्यामधलं प्रेम, आणि पोराने म्हटलेलं एक वाक्य.. ‘आई एकदम तुला राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार घेताना पहिल आणि भरून आलं.’ नवरा फोनवरून सतत संपर्कात तो हि जाम खुश, सासूबाई,जाऊबाई, आत्याबाई, नणंद बाई, भावंड, सगळ्यांसगळ्यांचे कौतुकाचे फोन मित्र मैत्रिणीचे फोन..शुभेच्छा वर्षाव.. खूप खूप शब्दात न सांगता येणारा न मावणारा आनंद झालाय.. मंडळी हे प्रेम आहे तुम्हा सर्वांच, ज्यामुळे मी माझं काम जबाबदारीने पार पाडण्याचा कायम प्रयत्न करत असते. असंच प्रेम कलाकारावर राहू द्या आणि सूर्यदत्तचे संस्थापक ह्यांचे देखील आभार आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझ्या देवाचे आभार.” यासोबतच तिने हास्यजत्रेच्या टीमचे आभार मानले आहे.

पुण्यातल्या सूर्यदत्त समूह शिक्षण संस्थेतर्फे राजभवन येथे आयोजित एका कार्यक्रमात सूर्यदत्त स्त्री शक्ती पुरस्कार देण्यात आले. कोरोनामुळं राजभवनात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिमानास्पद! ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२१’ने उर्वशी रौतेलाचा गौरव; फोटो अन् व्हिडिओ केला शेअर

-‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; फोटो शेअर करत दिली ‘गुडन्यूज’

-अरे व्वा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने रचलाय नवीन विक्रम; आठव्यांदा साकारणार ‘महादेवा’ची भूमिका

हे देखील वाचा