‘बिग बॉस मराठी‘च्या तिसऱ्या पर्वात विशाल निकमने ट्रॉफी जिंकून अवघ्या महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. घरात आल्यापासून त्याने त्याच्या खेळाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. बिग बॉसच्या घराबाहेर गेलेल्या प्रत्येक स्पर्धकाने त्याचे आणि त्याच्या खेळाचे कौतुक केले आहे. सर्वांना मदत करणे, खिलाडूवृत्ती आणि जिद्द या गोष्टींमुळे तो नेहमीच्या चाहत्यांमध्ये चर्चेत राहिला. घरात बदलत्या समीकरणानुसार त्याने स्वतःला सावरले. तसेच त्याच्या मित्रांना देखील तो वेळोवळी मदत करत होता. यामुळेच त्याने लाखो प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली आहे.
सोशल मीडियावर ‘विशलियन्स’ आणि ‘विशालप्रेम’ असे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले होते. त्यामुळे पहिल्याच आठवड्यात त्याने त्याच्या स्वभावाने आणि खेळाने खास जागा निर्माण केली. त्यामुळे त्याची फॅन फॉलोविंग झपाटयाने वाढली. विशाल हा बिग बॉसच्या घरात असताना बहुतांश वेळा नॉमिनेट झाला आहे. तरी देखील प्रत्येक आठवड्यात त्याच्या चाहत्यांनी त्याला बहुमताने प्रथम क्रमांकावर ठेवले. त्याच्या या यशात त्याचा जेवढा वाटा आहे तेवढाच किंबहुना त्यापेक्षाही जास्त वाटा त्याच्या चाहत्यांचा आहे. (vishal nikam fans are so happy to see him as a winner of bbm 3)
विशाल विजयी झाल्यानंतर आता त्याच्या चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. सर्वत्र आनंद उत्सव चालू आहे. कोणी डीजेवर डान्स करून तर कोणी फटाके वाजवत हा आनंद साजरा करत आहेत. त्याच्या गावाकडच्या चाहत्यांनी गावात दिवाळी असल्याप्रमाणे आनंद साजरा केला आहे. त्यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गावा-गावात आता फक्त विशालची चर्चा चालू आहे. विशाल हा बिग बॉसमधील असा एकमेव स्पर्धक आहे ज्याने तरुणांपासून ते जेष्ठांपर्यंत सगळ्यांच्या मनात जागा मिळवली होती.
विशालला जेव्हा बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाची ट्रॉफी मिळाली, तेव्हा त्याने ती ट्रॉफी त्याच्या आईला आणि त्याच्या सगळ्या चाहत्यांना समर्पित केली. तसेच त्याने सांगितले की, त्याच्या चाहत्यांशिवाय तो इथंपर्यंत पोहचू शकला नसता. त्यामुळे त्याच्या चाहत्यांचे त्याच्याबाबत प्रेम आणि आदर जास्त वाढला आहे.
हेही वाचा :
‘हा’ माणूस नसता तर सलमान सुपरस्टार झाला नसता, जाणून घ्या सलमानला ‘प्रेम’ नाव देणाऱ्या दिग्गजाबद्दल