‘या’ चित्रपटानंतर ६ महिने हातावर हात धरून बसला होता ‘भाईजान’, तर ‘हे’ आहेत अभिनेत्याचे ५ प्रसिद्ध डायलॉग


बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान (Salman Khan) सोमवारी (२७ डिसेंबर) त्याचा ५६वा वाढदिवस साजरा करत आहे. तो त्याच्या अनोख्या डान्स मूव्ह्ज, ऍक्शन आणि चित्रपटांमधील अभिनयासाठी ओळखला जातो. सलमानही फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. प्रसिद्ध हिंदी चित्रपट लेखक सलीम खान आणि त्यांची पहिली पत्नी सुशीला चरक यांचा तो मोठा मुलगा आहे. सलमानबद्दल असे म्हटले जाते की, तो ज्याच्यावर हात ठेवतो त्याचे नशीब इंडस्ट्रीत चमकते. अरबाज, सोहेल, अलविरा आणि अर्पिता अशी ही पाच भावंडे आहेत.

सलमानची दुसरी आई हेलन त्यांच्या काळातील लोकप्रिय कॅबरे डान्सर होत्या. शालेय शिक्षण संपल्यानंतर सलमानने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, पण त्याने मध्येच कॉलेज सोडले. एकीकडे सलमान जिथे लोकांना मदत करण्यासाठी प्रसिद्ध आहे, तर दुसरीकडे त्याच्या आयुष्यात असे अनेक वाद आहेत जे अनेकदा चर्चेच्या केंद्रस्थानी राहतात. ‘बिइंग ह्युमन’ या संस्थेच्या माध्यमातून सलमान गरजू लोकांना मदत करतो.

सूरज बडजात्याच्या ‘मैंने प्यार किया’ या रोमान्स चित्रपटाने बॉलिवूडमध्ये सलमानचे नशीब चमकले. हा चित्रपट त्या काळातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. मात्र, या चित्रपटानंतर सलमानला सहा महिने हातावर हात धरून बसावे लागले.

‘मैने प्यार किया’ या चित्रपटासाठी सलमानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. चित्रपटसृष्टीत सलमानला सर्व काही सहज मिळाले असे नाही, त्याने खूप संघर्षही केला आहे. सलमानने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, “माझ्या करिअरच्या सुरुवातीला मला खूप त्रास सहन करावा लागला आहे. जेव्हा मी लोकांकडे भूमिका विचारायला जायचो तेव्हा कोणी म्हणायचे की, मी हिरोसाठी लहान आहे, तर कोणी म्हणायचे की, मी वयाने मोठा आहे.”

‘हे’ आहेत सलमान खानचे पाच प्रसिद्ध डायलॉग्स
१. “हम बजरंगबली के भक्त हैं, मर जाएंगे लेकिन झूठ नहीं बोलेंगे” हा प्रसिद्ध डायलॉग ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील आहे.

२. “शिकार तो सब करते हैं लेकिन टाइगर से बेहतर शिकार कोई नहीं करता.” हा डायलॉग ‘टायगर जिंदा है’ चित्रपटातील आहे.

३. “स्वागत नहीं करोगे हमारा.” हा डायलॉग ‘दबंग’ चित्रपटातील आहे.

४. “एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं अपने आपकी भी नहीं सुनता.” सलमान खानचा हा प्रसिद्ध डायलॉग ‘वाँटेड’ चित्रपटातील आहे.

५.“यकीन एक ट्यूबलाइट की तरह होता है, देर से जलता है, लेकिन जब जलता है तो फुल लाइट कर देता है.” हा डायलॉग ‘ट्यूबलाइट’ चित्रपटातील आहे.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!