‘बिग बॉस’ हा टेलिव्हिजनवरील सर्वात चर्चित असणारा शो आहे. हा शो अनेक भाषांमध्ये चालू आहे. हिंदीमधील या शो ची लोकप्रियता बघून हा शो मराठीमध्ये देखील चालू झाला आहे. या शोचे मराठीमध्ये तीन पर्व पूर्ण झाले आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी तिसऱ्या पर्ववणे प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या शोमध्ये विशाल निकम हा विजेता झाला आहे. त्याच्यावर अनेकजण शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. शोमध्ये असताना तो नेहमीच चर्चेत होता. त्याच्यासोबत घरातील अनेक स्पर्धक चर्चेत होते. घरात ह.भ. प. कीर्तनकार शिवलीला पाटील हिची एन्ट्री झाली होती. परंतु तब्येतीच्या कारणाने तिने केवळ दोन आठवड्यातच या शोचा निरोप घेतला.
एक कीर्तनकार असून तिने या शोमध्ये एन्ट्री केल्यामुळे अनेक क्षेत्रातून तिच्यावर टीका करण्यात आल्या होत्या. घरात असताना तिचे विशाल निकमसोबत एक छान असे नाते तयार झाले होते. बिग बॉसमधील बहीण भाऊ असे सगळेजण त्यांचा उल्लेख करत होते. परंतु शिवलीला केवळ दोन आठवड्यात घरा बाहेर गेल्याने त्यांची जोडी तुटली. (Vishal nikam meet to shivleela patil in pandharpur)
विशाल निकम हा विजेता जाऊन जेव्हा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला त्यानंतर त्याने शिवलिलाची पहिली भेट घेतली. विशाल टोला पंढरपूरला भेटायला गेला होता. त्या दोघांची भेट झाली. त्यांनी चंद्रभागा नदीचे दर्शन घेतले आहे. त्यांचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
त्यांच्या भेटीचा हा व्हिडिओ विशालने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्याने लिहिले आहे की, “बिग बॉसच्या घरामध्ये बोललो होतो, पहिलं कोणाला भेटून तर शिवलील यांना आणि आज आमची भेट झाली, ती सुद्धा मार्गशीर्ष महिन्यात. माऊलींच्या पंढरपुरात. ही भेट माउलींनी च घडवून आणली असावी.” त्याने केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
हेही वाचा :
…म्हणून योगिता तिचे लाल रंगाचे कपडे कधीही घालते, सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट आली चर्चेत
नवीन वर्षाच्या रात्री नेहा कक्कर अन् रोहनप्रीतमध्ये घडले ‘असे’ काही, की स्टेजवरच गायिकेला कोसळले रडू
‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच विशाल-विकास जोडीने घेतले जोतिबाचे दर्शन, पाहा व्हिडिओ