Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

काय सांगता! अमृता रावचे लग्न २०१६ मध्ये नाही तर…, आरजे अनमोलने केला त्यांच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत असते. पती आरजे अनमोलसोबत ती तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे करत असते. पुन्हा एकदा अमृता राव आणि अनमोलने एक खास खुलासा केला आहे. हे जाणून या स्टार कपलच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसू शकतो. 

अमृता (Amrita Rao) आणि अनमोल दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्न झाले. २०१६ मध्ये सर्वांना त्यांच्या लग्नाची माहिती देण्यात आली होती. आता या जोडप्याने खुलासा केला आहे की, त्यांनी २०१४ मध्येच लग्न केले होते. परंतु त्यांनी याबद्दल कोणालाही सांगितले नव्हते. याचे कारण त्यांनी स्वतःच दिले आहे.

अमृता-अनमोलने त्यांचे लग्न दोन वर्षे ठेवले लपवून 

अमृता राव आणि आरजे अनमोल यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर त्यांच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. ‘कपल ऑफ थिंग्स’मध्ये या जोडप्याने त्यांच्या गुप्त लग्नाबद्दल जगाला सांगितले आहे. या कार्यक्रमात दोघांनीही त्यांच्या लग्नाच्या तारखेबद्दल सर्व काही चाहत्यांसमोर उघडले आहे. यादरम्यान त्यांनी २०१६ मध्ये नव्हे, तर २०१४ मध्येच लग्न केल्याचे सांगण्यात आले. अमृताच्या कारकिर्दीवर त्याचा परिणाम होऊ नये हेच त्यामागचे कारण होते.

अमृता रावला तिच्या करिअरची होती काळजी

व्हिडिओमध्ये तिच्या गुप्त लग्नाचे वर्णन करताना अनमोल म्हणाला की, “अमृताला ३ मोठ्या बॅनरच्या चित्रपटांची ऑफर आली होती आणि तिची कारकीर्द महत्त्वपूर्ण वळणावर होती. एकदा मी अमृताला लग्नासाठी विचारले, तर तिने नकार दिला.” अमृताने सांगितले की, २०१२ मध्ये तिला ‘जॉली एलएलबी’, ‘सत्याग्रह’ आणि ‘सिंह साहब द ग्रेट’ सारखे चित्रपट मिळाले. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा अनमोल म्हणाला चला लग्न करूया, तेव्हा अमृता म्हणाली की, “गोष्टी पुन्हा रुळावर येत आहेत. हे चित्रपट प्रदर्शित होतील आणि मला मोठे चित्रपट करायचे आहेत. जर मी लग्न केले, तर ही बातमी माझ्या करिअरला खूप त्रास देईल.” अनमोलने सांगितले की, तिच्या लग्नाची बातमी मीडियात आली तर ती फेटाळली जाईल, या विचाराने ती घाबरली होती.

अनमोलच्या मनात आला लग्नाचा गुप्त प्लॅन 

यानंतर अनमोलच्या मनात गुप्त लग्नाची कल्पना आली. अनमोल म्हणाला की, “जर आम्ही आमच्या अफेअरबद्दल ४-५ वर्षे गुप्त ठेवू शकलो, तर आम्ही आमचे लग्नही लपवू.” त्यांनी २५ मे २०१४ रोजी लग्न केल्याची पुष्टी केली. अमृता आणि अनमोल यांनी त्यांच्या चाहत्यांना वचन दिले आहे की, ते पुढील व्हिडिओमध्ये त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करतील.

हे देखील वाचा