Monday, July 1, 2024

विवेक अग्निहोत्री निघाले 5 सुरक्षा रक्षकांसह मॉर्निंग वॉकला, पाहा व्हायरल व्हिडिओ

द काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते मॉर्निंग वॉकसाठी जाताना दिसत आहे आणि त्याच्यासोबत बॉडीगार्डही आहेत. काश्मिरी पंडितांच्या हत्या आणि काश्मीरमधून पलायन यावर आधारित चित्रपट बनवण्याची किंमत मोजावी लागली, असे ते म्हणाले. विवेक अग्निहोत्री यांना या व्हिडिओवरून प्रचंड ट्रोल केले जात आहे.

व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत विवेक अग्नीहाेत्री यांनी (vivek agnihotri) लिहिले की, “काश्मीरमध्ये हिंदूंचा नरसंहार दाखवण्याची किंमत मोजावी लागली आहे. एक हिंदूबहुल देश. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हा.” यासाेबतच विवेकने ‘स्वतःच्या देशात कैद’ आणि ‘फतवा’ असे हॅशटॅग जोडले. ते काळ्या रंगाच्या ट्रॅक सूटमध्ये दिसत आहे आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा एक संपूर्ण ग्रुप त्यांच्यासोबत चालला आहे.

या व्हिडिओला ट्विटरवर प्रचंड ट्रोल केले जात आहे. व्हिडिओवर एका युजरने ट्राेल करत लिहिले की, “अरे माझ्या कराचे पैसे”, तर दुसर्‍या युजरने कमेंट करत लिहिले की, “करदात्यांच्या पैशाचा अपव्यय!” काहींनी असा दावा केला की, चित्रपट निर्माते त्यांचे वाई प्लस सिक्योरिटी दाखवत आहे.

या वर्षी मार्चमध्ये त्याचा ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, चित्रपट निर्मात्याला वाई प्लस सिक्योरिटी देण्यात आले होते, ज्याचे रक्षण चार ते पाच सशस्त्र कमांडो होते. या चित्रपटाने जगभरात 340 कोटींची कमाई केली. तसेच, हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणार्‍या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे. यात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर आणि भाषा सुंबली यांच्या भूमिका आहेत.

विवेक यांनी अलीकडेच त्यांचा पुढचा चित्रपट ‘द वॅक्सीन वॉर’ची शूटिंग सुरू केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, त्यांनी चित्रपटाच्या शूटिंग सुरू झाल्याची घोषणा करण्यासाठी स्क्रीनप्ले आणि क्लॅपबोर्डचे फाेटाे शेअर केले होते. पुढील वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट 11 भाषांमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे.(vivek agnihotri brutally trolled for going out on morning walk with 5 security guards people say oh my tax money)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मी कधीही पैशांसाठी लग्नसोहळ्यात नाचले नाही’, कंगनाने थेट गाणसम्राज्ञी लता मंगेशकरांशीच केली तुलना

राम-लखन पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर, ‘या’ चित्रपटात पाहायला मिळणार ‘ही’ धमाकेदार जोडी

हे देखील वाचा