Thursday, June 13, 2024

‘मी कधीही पैशांसाठी लग्नसोहळ्यात नाचले नाही’, कंगनाने थेट गाणसम्राज्ञी लता मंगेशकरांशीच केली तुलना

प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रानौत सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ओळखली जाते. त्याशिवाय तिने अनेकदा बॉलिवूड इंडस्ट्रीविरोधातही बिंधास्तणे टीका केली आहे. त्याशिवाय अभिनेत्री राजाकारणातही नशिब आजमावत आहे. कंगना तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी प्रेक्षकांचे लक्ष वेधत असते. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने लग्नात डान्स करण्याचा मुद्दा उचलला आहे. आणि यामध्ये तिने भारताची गाण कोकिळा लता मंगेशकर यांच्या सोबत तुलना केली आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) हिने अनेकदा समाजातील अनेक मुद्द्यांवर आणि बॉलिूडमधील नोपोटिझमवर आपले स्पष्टच मत व्यक्त करत असते. कंगनाचे अनेक गाणे आहेत जे लग्नामध्ये सतत वाजवली जातता. जसं की ‘लंडन ठुमकदा’, हे गाणं नेहमी लग्नाच्या कार्यक्रमामध्ये वाजवलं जातं मात्र, कंगनाने कधीच कोणत्याच प्राइवेट लग्नामध्ये किंवा पार्टीमध्ये डान्स नाही केला. नुकतंच कंगनाने आशा भोसले (Asha Bhosle) यांचा थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सांगितले आहे की, लता मंगेशकर ह्या कोणाच्याही लग्नात किंवा प्राइवेट पार्टीमध्ये गाणं म्हण्याच्या विरोधात होत्या. त्याशिवाय त्यांनी लाखो डॉलर्सच्या ऑफर्सही धुडकावल्या होत्या.

कंगनाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर आशा भोसले यांची व्हिडिओ क्लीप शेअर करत लिहिले की, “मी सहमत आहे. माझ्याकडे सर्वाधिक लोकप्रिय गाणं असूनही मी कधीही लग्नसोहळ्यात किंवा खाजगी पार्ट्यांमध्ये नाचले नाही… मी विड्याची रक्कम घेण्यास नकार दिला आहे… हा व्हिडिओ पाहून आनंद झाला. .. लताजी खरोखरच तुम्ही खूप प्रेरणादायी आहेत.”

kangna ranaut post
Photo Courtesy: Instagram/kanganaranaut

कंगानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आशाजिंनी त्यांची मोठी बहिन लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या बद्दल सांगितले की तिला लग्नात गाण्यासाठी एकदा मिलियान डॉलरची ऑफर आली होती. मात्र, तिने कधीच प्रपोजर स्वीकारले नाही. आशाजिंनी प्रपोजलद्दल सांगितले की, “फक्त 2 तास दर्शन देण्यासाठी तुम्ही आमच्या लग्नामध्ये या…”

कंगणाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या तिचा आगामी येणारा ‘इमरजेंसी’ चित्रपटाच्या दिग्दर्शनामध्ये व्यस्त आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रिअल लाईफ हिरो! तस्करीमध्ये अडकलेल्या तब्बल 128 महिलांना सुनील शेट्टीने दिले जीवनदान
‘बिग बॉस’च्या घरात श्रीजीता डेने खोलली टीना दत्ताची पोल म्हणाली, ‘हिला फक्त मुलांकडून…

हे देखील वाचा