Sunday, June 8, 2025
Home अन्य विवेक अग्निहोत्रींनी पुन्हा एकदा बॉलिवूडकरांवर साधला निशाणा; म्हणाले, ‘मोदींमुळे मला…’

विवेक अग्निहोत्रींनी पुन्हा एकदा बॉलिवूडकरांवर साधला निशाणा; म्हणाले, ‘मोदींमुळे मला…’

काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आपल्या चित्रटांसोबतच परखड वक्तव्यासाठी ओळखले जातात. बॉलिवूडकर आणि त्यांचा छत्तीसचा आकडा आहे असंही त्यांच्या भाषणावरुन स्पष्ट होत असतं. काही दिवसांपूर्वी ऑस्करच्या यादीत त्यांच्या काश्मीर फाईल्स चित्रपटाचेही नाव होते त्यामुळे दिग्दर्शकांनी अनेकाचं लेक्ष वेधलं होतं. हा चित्रपटही वादाच्या भोवऱ्यात अडकला असून सामाजिक आणि राजकीय वातारण चांगलंच तापलं होतं. मात्र, तरीही बॉक्सऑफिसवर चित्रपटाने धुमाकूळ घातला होता.

प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी (Vivek Agnihotri) पुन्हा आपल्या वक्तव्यामुळे चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे. राजकारण असो किंवा बॉलिवूडवर निशाना साधने असो अग्निहोत्रींनी सतत आपले स्पष्ट मत मांडलं अहे. अशातच अग्निहोत्री आणि दिग्दर्शक अनुराग कश्याप (Anurag Kashyap) यांच्यामध्ये वाद पाहायला मिळत आहेत. त्यांच्या वादाची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगली आहे. काहीही झालं तर आपण मोदींनाच सपोर्ट करणार असं वक्तव्य करत अनेकांना मोठो धक्का दिला आहे. त्याशिवाय त्यांनी केलेल्या विधानावर स्पष्टीकरणही दिलं आहे.

अग्निहोत्रींनी केलेल्या विधानाचे स्पष्टीकरण देत शाहरुख खान (Shahrukh Khan) स्टारर पठाण (Pathan) चित्रपटाचाही उल्लेख केलाय, ते म्हणाले की, “शाहरुख चांगल्या कलाकारासोबतच मेहनती आणि प्रतिभावान अभिनेता आहे. पण एक गोष्ट खरी ती म्हणजे बॉलीवूडमधील अनेकांना माझा राग आहे. त्यांना मी आवडत नाही. ते सतत माझ्याविषयी बोलत असतात. याच्या मागचं कारण म्हणजे मी मोदींना पाठिंबा देतो, त्यांचे विचार मांडतो. म्हणून हा सगळा राग आहे. मोदींचे समर्थन करतो म्हणून मला विरोध होतो.”

अग्निहोत्रींच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ते पुन्हा एकदा ‘व्हॅक्सीन वॉर’ नवीन चित्रपाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा चित्रपट (दि, 15 ऑगस्ट) रोजी सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शिव ठाकरेच्या आई-वडिलांच्या साधेपणाची चाहत्यांनाही भुरळ; म्हणाले, ‘एवढे चांगले संस्कार…’
प्रत्येक रेट्रो गोष्ट तिच्यात सुंदर आहे…! धनश्री काटगावकरचा नवीन लूक

 

हे देखील वाचा