Wednesday, March 29, 2023

शिव ठाकरेच्या आई-वडिलांच्या साधेपणाची चाहत्यांनाही भुरळ; म्हणाले, ‘एवढे चांगले संस्कार…’

गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस 16च्या महापर्वासाठी चाहत्यांप्रती उत्सुकता पाहायला मिळत आहे. बिग बॉस 16 चा विजेता कोण होणार हे काही तासातच आपल्याला समजणार आहे. प्रोमो व्हिडिओमध्ये  महाअंतिम सोहळ्यात प्रियंका चहर चौधरी आणि शिव ठाकरेमध्ये टशन पाहायला मिळाला तर एमसी स्टॅन, अर्चना गौतम आणि शालीन भनोट यांच्या हटके अंदाजात एन्ट्री पाहायला मिळाली. अशातच सोशल मीडियावार शिवची जास्त चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे.

यंदाच्या बिग बॉस 16 (Bigg Boss 16) च्या पर्वाने सर्वत्र धूमाकुळ घातला आहे. एकापेक्षा एक धमाकेदार स्पर्धक या पर्वाला लाभले. शेवटी अनेक दिवसांपासून आतुरता असेलला तो दिवस म्हणजे बिग बॉस16चा महाअंतिम सोहळा आणि कोण पटकावेल ट्रॉफीचा मान, यासाठी चाहत्यांमध्ये कमालीची क्रेज पाहायाल मिळत आहे. मात्र, या सगळ्यामध्ये चाहत्यांप्रती मराठमोळ्या शिव ठाकेरची जास्त चर्चा पाहायला मिळत आहे. शिवला त्याच्या चाहत्यांसह मराठी कलाकारांचा पाठिंबा मिळत आहे. महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, यांसारख्या मंडळींनी शिवसाठी सोशल मीडियाद्वारे खास पोस्ट शेअर करत शिवला वोट करा असं म्हटलंय. अशातच त्याच्या आई-वडिलांचा व्हिडीओ देखिल सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नुकतंच शिवच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन त्याच्या टीमने आई- वडीलांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये शिवला भरभरुन वोट करा असं सांगितल आहे. शिवच्या आई- वडीलांच्या साधेपणाने चाहत्यांवर भुरळ घातली असून व्हायरल डिओवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. त्याशिवाय चाहत्यांनी शिवला दिलेल्या संस्कारांचे कौतुकही केले आहे.

 

View this post on Instagram

 

एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले की, “काळजी करुन नका आई ट्रॉफी शिवच जिंकणार आहे.” तर दुसऱ्याने लिहिले, “जगातील सगळे आई-वडील किती सारखेच असतात.” तर एका अन्यने लिहिले, “तुम्हा दोघांना पाहिल्यानंतर समजते की, शिवमध्ये एवढे चांगले संस्कार कुठून आलेत तुम्ही खूपच साधे आहात, तुमच्यामधील साधेपणा भावला, आमचा शिव दादाच जिंकणार”, अशा प्रकारच्या अनेक कमेंटनी व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रत्येक रेट्रो गोष्ट तिच्यात सुंदर आहे…! धनश्री काटगावकरचा नवीन लूक
उफ्फ तेरी अदा…! अमृता खानविलकरचा हॉट लूक, पाहाच एकदा फोटो गॅलरी

हे देखील वाचा