बॉलिवूडमधील कलाकरांसोबतच त्यांची मुलं देखील नेहमीच लाईमलाइट मिळवताना दिसतात. आज मीडियामध्ये किंवा ग्लॅमर जगात स्टार किड्स हा मोठा आणि नेहमीच चर्चेत येणार मुद्दा आहे. पापराजींचे नेहमीच स्टार किड्सकडे लक्ष असते. असे असूनही बॉलिवूडमध्ये असे देखील काही कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या मुलांना मीडिया पासून लांब ठेवले आहे. त्यातलेच एक नाव म्हणजे अभिनेता विवेक ओबरॉय. विवेकने २०१० साली प्रियांका अल्वासोबत लग्न केले. आज त्यांच्या लग्नाला १० वर्षांपेक्षा अधिकच काळ लोटला असून, त्यांना विवान आणि अमाया ही दोन मुलं आहेत. विवेक नेहमीच त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा अधिक वैयक्तिक आयुष्यामुळे गाजला. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी सर्वश्रुत आहेत. मात्र विवेकच्या मुलांबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे.
एका कार्यक्रमादरम्यान विवेक त्याच्या मुलांबद्दल भरभरून बोलला. यातच त्याने त्याची लेक असलेल्या अमायाबद्दल बोलताना त्याने एक किस्सा सर्वांना सांगितला. तो म्हणाला, “एकदा मी माझ्या मुलांसोबत बसून माझे ‘साथिया’ आणि ‘प्रिन्स’ हे दोन सिनेमे बघत होतो. या सिनेमांमध्ये किसिंग सीन देखील आहे. आम्ही सिनेमे पाहिले आणि त्यानंतर माझी छोटी सात वर्षाची अमाया मला म्हणाली, “डॅडा तू जिला किस केले ती ममा नव्हती. तुला कोणालाही किस करण्याची परवानगी नाही. तू ममा सोडून कोणालाच किस करायचे नाही.’ तिची ही क्युट वॉर्निंग ऐकून मला खूपच मस्त वाटले.” मी तिचे ऐकून तिला ‘ओके’ एवढेच म्हटले.”
View this post on Instagram
विवेक आणि प्रियांका यांची पहिली भेट एका लग्नात झाली होती. विवेकच्या आईने या लग्नासाठी पुढाकार घेतला होता. लग्नाआधी विवेक आणि ऐश्वर्या राय यांचे नाते तुफान गाजले होते. विवेक नेहमीच सोशल मीडियावर त्याच्या आनंदी कुटुंबाचे फोटो शेअर करत असतो. सोशल मीडियावर पाहिले तर विवेकने त्याच्या मुलांसोबत बरेच फोटो शेअर केले आहे. विवेकने त्याच्या मुलांना मीडियापासून लांब ठेवणे पसंत केले आहे. विवेकने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून, हिंदीसोबतच तो साऊथमध्ये देखील लोकप्रिय आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारल्या असून, अनेक पुरस्कार देखील पटकावले आहे. लवकरच विवेक रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ सिरीजमध्ये दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सतत ड्रेस सावरताना दिसली भोजपुरी स्टार आम्रपाली दुबे
हसरा चेहरा इतिहास गेहरा! गौरी नलावडेचा शाइनी लूक