Friday, July 5, 2024

विवेक ओबेरॉयच्या प्लेटमध्ये ऑम्लेटच्या जागी चक्क हेल्मेट! मजेशीर व्हिडिओ सोशलवर व्हायरल

अभिनेता विवेक ओबेरॉयने १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तो आपल्या पत्नीसोबत ‘साथिया’ सिनेमातील स्टाईलने बाईक चालवत आनंद घेत होता. सोबतच त्याने हा व्हिडिओ शेयर करताना कॅप्शनमध्ये देखील लिहिले होते की, ‘माझ्या पत्नीसोबत व्हॅलेंटाईन डेची सुंदर सुरुवात.’ त्याचा या व्हिडिओने त्याला भलतेच अडचणीत आणले होते. कारण त्यात त्याने दुचाकी चालवत असताना हेल्मेट सुद्धा घातले नव्हते आणि चेहऱ्यावर मास्क देखील लावले नव्हते. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला जबर धारेवर धरले होते.

विवेकने हेल्मेट विना दुचाकी चालवली असल्याने त्याला चलन भरावे लागले होते. त्याची ही चूक त्याला कळल्यापासून तो सोशल मीडियावर काही न काही पोस्ट करत असतो. आपल्या या चुकीची कबुली त्याने सोशल मीडियाद्वारे दिली होती. इतरांना असे करू नये, असे आवाहन त्याने केले होते. मात्र, आता तो आपल्या एक नवीन व्हिडिओमार्फत पून्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याची ही पोस्ट तुम्हाला देखील हसायला नक्कीच भाग पाडेल.

या व्हिडिओमध्ये विवेक आपल्या जेवणाची वाट पाहत आहे. जेव्हा तो प्लेटमध्ये काहीतरी खायचा विचार करत असतो, तेव्हा त्याला असे दिसते की प्लेटमध्ये ऑम्लेटच्या ऐवजी हेल्मेट आले आहे. आपला हा व्हिडिओ शेअर करताना त्याने असे लिहिले आहे की, “जर तुम्हाला डोक्याचे ऑम्लेट होण्यापासून वाचवायचे असेल, तर तुम्ही रायडींग करत असताना हेल्मेट नक्कीच घाला.” सोबतच त्याने नॅशनल सेफ्टी डे, सडक सुरक्षा आणि रोड सेफ्टी असे हॅशटॅग दिले आहेत. तसेच ‘अंडी फोडा डोकं नको’ असा संदेश त्याने या व्हिडिओमार्फत दिला.

विवेकचा हा व्हिडिओ पाहून भल्याभल्यांना आपले हसू आवरले नाही. त्याच्या या व्हिडिओला चाहत्यांनी सुध्दा भरभरून प्रतिसाद दिला. सोबतच त्याचा हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस देखील उतरला आहे.

मध्यंतरी बंगरुळ सिटी क्राईम ब्रांचने ड्रग्स प्रकरणातील एका व्यक्तीच्या शोधात विवेकच्या घरी छापा टाकला होता. ती व्यक्ती विवेक ओबेरॉयचा नातेवाईक असल्याचं सांगण्यात येत होते. त्यामुळे ती व्यक्ती विवेकच्या घरी लपली आहे असा संशय असल्यामुळे पोलिसांनी विवेकचे घर गाठले होते.

सन २००२ मध्ये बॉलिवूडमध्ये विवेक ओबेरॉयने राम गोपाळ वर्मा यांच्या ‘कंपनी’ चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्याला ‘बेस्ट पदार्पण’ आणि ‘बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर’ हा पुरस्कार मिळाला आहे त्यासोबतच त्याने ‘शूटआऊट ऍट लोखंडवाला’, ‘क्रिश३’, ‘पीएम मोदी’ अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेता असण्याबरोबरच विवेक याचे ‘ओबेरॉय मेगा इंटरटेनमेंट’ हे प्रोडक्शन हाऊस देखील आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ये मैं हू, ये मेरा घर है और यहा…’, राखी सावंतने शेयर केला व्हिडिओ; चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

-नेहा कक्कर अन् गुरु रंधावा प्रथमच आले एकत्र, पाहा या जोडीचे ‘और प्यार करना है’ हे ताजं गाणं

-भारतीय सैनिकाच्या पत्नीच्या व्यथा सांगणारं ‘तुम बिन’ गाणं युट्यूबलर करतंय राडा, हिट्सचा पडतोय पाऊस

हे देखील वाचा