बॉलिवूडमध्ये ‘ट्विंकल टोज’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री वैजयंती माला 60च्या दशकातील एक प्रसिद्ध नायिका होत्या. त्यांनी आपल्या अभिनय आणि डान्सच्या जोरावर कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर राज्य केले. वैजयंती यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत आणि त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या सर्व बड्या कलाकारांसोबत काम केले आहे. चित्रपटांप्रमाणेच वैजयंती यांच्या अफेअरच्याही चर्चा प्रसिद्ध होत्या. मात्र, अभिनेत्रीने त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरसोबत लग्न केले. आम्ही तुम्हाला 13 ऑगस्ट रोजी 90वा वाढदिवस साजरा करणाऱ्या वैजयंती माला यांचा हा किस्सा सांगणार आहोत.
वैजयंती माला यांनी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी चित्रपटाच्या जगात पाऊल ठेवले होते. 1949मध्ये तमिळ चित्रपट ‘वड़कई’ मधून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तसेच, त्यांनी 1951 ‘बहार’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर वैजयंती माला यांनी बर्याच चित्रपटांमध्ये काम केले. वैजयंती माला चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान अभिनेता राज कपूर यांच्या जवळ आल्या.
सन 1964 मध्येे आलेल्या ‘संगम’ या चित्रपटात वैजयंती माला यांनी राधाची भूमिका साकारली होती. त्यावेळी राधाचे हे पात्र बरेच बोल्ड होते. यासह या चित्रपटातील ‘मैं क्या करु राम मुझे बुढ्ढा मिल गया’ हे गाणे खूप प्रसिद्ध झाले. या चित्रपटात त्यांच्यासोबत राज कपूर मुख्य भूमिकेत होते. दोघे एकत्र असलेला हा शेवटचा चित्रपट होता, त्यानंतर राज आणि वैजयंतीची हिट जोडी तुटली.
वास्तविक, राज कपूर यांचे लग्न झाले होते आणि त्यांना मुलेही होती. वैजयंती यांच्याशी असलेले प्रेमसंबंध जेव्हा राज यांच्या पत्नी कृष्णाला समजले, तेव्हा त्या मुलांना घेऊन हॉटेलमध्ये राहायला गेल्या होत्या. त्या मुंबईतील नटराज हॉटेलमध्ये जवळपास साडेचार महिने राहिल्या होत्या. राज कपूर यांनी पत्नी कृष्णाची लाखवेळा समजूत काढल्यानंतर ती मान्य झाली. मात्र, राज यांनी पत्नीला वचन दिले की, वैजयंतीबरोबर पुन्हा कधीही चित्रपटात काम करणार नाही. ‘संगम’ चित्रपटानंतर राज आणि वैजयंती यांनी कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केले नाही.
राज कपूरपासून दूर गेल्यानंतर वैजयंती आपल्या चित्रपटांमध्ये व्यस्त झाल्या आणि त्यादरम्यान त्यांना निमोनियाचा आजार झाला. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर चमनलाल बाली हे वैजयंती मालाचे खूप मोठे चाहते होते. उपचारादरम्यान वैजयंती माला आणि डॉक्टर बाली एकमेकांच्या प्रेमात पडले. 10 मार्च 1968 रोजी त्यांचे लग्न झाले आणि दोघांना सुचिंद्र बाली नावाचा मुलगाही आहे.
वैजयंती माला यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुकही केले. त्यांच्या यशस्वी चित्रपटांमध्ये ‘नई दिल्ली’, ‘नया दौर’ आणि ‘आशा’ यांचा समावेश आहे. तसेच ‘मधुमती’, ‘गंगा जमुना’ आणि ‘संगम’ या चित्रपटासाठी वैजयंती माला यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
…म्हणून तुटलं होतं दिलीप कुमार अन् मधुबालाचं नातं, ‘या’ अभिनेत्रीला मिळालेली ‘नया दौर’मध्ये मोठी संधी
वैजयंती माला यांना नव्हते करायचे चित्रपटात काम, एका डान्स परफॉर्मन्सने बदललं आख्खं आयुष्य