Tuesday, July 9, 2024

३० वर्षांनंतर पुन्हा येणार ‘वागळे की दुनिया’, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

८० च्या दशकात दूरदर्शनवर आलेल्या ‘वागळे की दुनिया’ ही मालिका पुन्हा एका नवीन पिढीचे किस्से घेऊन सोनी सब चॅनेलवर परत येत आहे. तीस वर्षांपूर्वी ‘वागळे की दुनिया’ या मालिकेने अतिशय लोकप्रियता मिळवली होती. विशेष म्हणजे शाहरुख खान देखील या मालिकेचा भाग होता.

या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे अंजन श्रीवास्तव ‘वागळे’ म्हणून प्रसिद्ध झाले होते. या नवीन ‘वागळे की दुनिया’ मालिकेत अंजन श्रीवास्तव पुन्हा ‘वागळे’ची भूमिका साकारत असून भारती आचरेकर त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. सुमित राघवन या दोघांच्या मुलाची भूमिका साकारणार आहे.

‘वागळे की दुनिया’ ह्या मालिकेत आजच्या मध्यमवर्गीय कुटुंबाच्या समस्या हलक्या फुलक्या स्वरूपात दाखवल्या जातात. या मालिकेतील कथेने आता झेप घेतली असून, या पिढीच्या नवीन समस्या आणि दररोजचे जीवन यात पाह्यला मिळणार आहे. ‘वागळे की दुनिया’ या मालिकेतील नवीन भाग, नवीन मजा, नवीन गमती पाहण्यासाठी सर्वच लोक उत्सुक आहेत.

नवीन ‘वागळे की दुनिया’ बद्दल सुमित राघवन म्हणतो, ” मी जुनी मालिका पाहिली होती. मला तू खूप आवडली होती. जुन्या गाजलेल्या भूमिकेला नवीन रूपात सादर करणे म्हणजे खूपच अवघड आहे. शिवाय अंजन श्रीवास्तव यांनी आधीच या भूमिकेला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. मी ही भूमिका साकारण्यासाठी खूपच उत्सुक आहे. प्रेक्षकांना सुद्धा ही मालिका बघताना खूप मजा येणार आहे. मी आशा करतो मी साकारणारा ‘वागळे’ देखील आधीच्या ‘वागळे’ इतकाच हिट होऊन लोकांना आवडावा.”

तर मग तयार राहा नवीन कलाकार, नवीन पटकथा, सामान्य माणसांच्या नवीन समस्या बघण्यासाठी.

हे देखील वाचा