सुपरस्टार देव आनंद (Anand deo)आणि वहीदा रहमान (waheeda Rehman) यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘गाईड’ (guide) अजूनही प्रेक्षकांचा आवडता चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये तयार करण्यात आला होता. हिंदीमध्ये बनलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले, तर इंग्रजी चित्रपटाला वेगळ्या क्लायमॅक्समुळे विशेष प्रतिसाद मिळाला नाही. ‘गाईड’ चित्रपटाला इंग्रजीमध्ये टड डॅनिएलेस्की यांनी दिग्दर्शित केले होते. वहिदा रहमान यांचा या चित्रपटातील अभिनय नावाजण्याजोगा होता. चित्रपटातील अभिनयाने त्या कौतुकास पात्र ठरल्या होत्या. वहिदा यांचा गुरुवारी (३ फेब्रुवारी) रोजी वाढदिवस आहे. चला तर यानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या गाईड या चित्रपटातील एक किस्सा.
जेव्हा हा चित्रपट इंग्रजीमध्ये शूट केला जात होता, तेव्हा दिग्दर्शकाने वहीदा रहमान यांना सांगितले की, तुम्हाला गारुड्यासोबत डान्स करायचा आहे आणि खऱ्या सापाला पकडून त्याच्या तोंडाला किस करायचे आहे. हे ऐकून वहीदा हसू लागल्या आणि म्हणाल्या, “हे कसे होईल?” हे ऐकून दिग्दर्शकाने वाद घालण्यास सुरुवात केली आणि म्हणाले की, “हे भारतात सामान्य आहे.” (waheeda rehman birthday special, intresting kissa of guide film)
वहीदा यांनी दिग्दर्शकाला समजावण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाल्या की, “तुम्हाला भारताबद्दल चुकीची माहिती आहे. साप पकडणे आणि त्याच्या तोंडावर किस करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.”
त्यावेळी सेटवर मोठमोठया लाईट्स चालू होत्या, गरमीमुळे पेटीतील साप बाहेर आला. साप बाहेर फिरत असल्याची बातमी सेटवर पसरताच, सर्वप्रथम दिग्दर्शक साहेबांनी तिथून धूम ठोकली. थोड्याच वेळात साप पकडला गेला आणि दिग्दर्शकाला सेटवर परत बोलवण्यात आले, तेव्हा वहीदा रहमान म्हणाल्या, “तुम्ही तर पळून गेलात.”
वहीदा यांचे बोलणे ऐकून दिग्दर्शक म्हणाले, “मला सापांची भीती वाटते, मी भारतीय नाही.” मग वहीदा म्हणाल्या, “तुमच्याप्रमाणे मलाही सापांची भीती वाटते, तुम्ही सापाला किस करण्याचा सीन काढून टाका आणि बाकीचे गाणे चांगले शूट करा.” मग दिग्दर्शकाला समजले की सापाला किस करणे सोपे नाही.
हेही वाचा :