ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांनी बॉलिवूडवर अनेक दशकं राज्य केले. अतिशय सुंदर आणि प्रतिभावान असलेल्या वहिदा रेहमान यांनी त्यांच्या कलेच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य केले. मात्र, त्या दिग्गज अभिनेते देव आनंद यांच्या मोठ्या चाहत्या होत्या. देव आनंद यांच्यासोबत त्यांनी अनेक सिनेमात काम केले. अशात देव आनंद यांची 03 डिसेंबर रोजी पुण्यतिथी असते. त्यानिमित्ताने जाणून घेऊया वहिदा रेहमान यांच्या मनातील देव आनंद यांच्याबद्दल असणाऱ्या भावनांबद्दल.
काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये वहिदा रेहमान (Waheeda Rehman) यांनी देव आनंद (Dev Anand) यांना ‘एक डिसेन्ट इश्कबाज’ म्हटले होते. एकदा अभिनेत्री ट्विंकल खन्नाशी बोलताना देखील त्यांनी देव आनंद यांच्याबद्दल भरभरून आठवणींना उजाळा दिला होता.
वहिदा रेहमान म्हणाल्या होत्या की, त्या देव आनंद साहेबांच्या खूपच मोठ्या चाहत्या होत्या. त्यांचा पहिला सिनेमा देखील देव आनंद यांच्यासोबतच होता. देव आनंद यांच्याबद्दल बोलतां वहिदा रेहमान यांनी सांगितले की, “जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो, तेव्हा त्यांनी मला विचारले की, वहिदा कशी आहेस? चल असे करू चल तसे करू.” मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटली, तेव्हा मी त्यांना ‘नमस्ते देव साहेब’ म्हणत त्यांना नमस्कार केला. मग ते मला म्हणाले होते की, मला फक्त ‘देव’ म्हणायचे.
वहिदा रेहमान यांनी देव आनंद यांना ‘डिसेंट इश्कबाज’ म्हटले. वहिदा स्वतः देव आनंद यांच्याशी खूपच फ्लर्ट करायच्या. त्या देव आनंद यांना नेहमी म्हणायच्या ‘तुम्ही खूपच सुंदर आहात.’ एकदा देव आनंद यांनी सांगितले होते की, “मला कोणाची पर्वाच नाही माझे पोट केवळ वहिदा आहेत.”
तत्पूर्वी वहिदा रेहमान या जेवढ्या उत्तम अभिनेत्री होत्या, तेवढ्याच उत्तम त्या डान्सर देखील होत्या. त्यांनी त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या डान्सने देखील प्रेक्षकांची मने जिंकली. वहिदा यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी सर्वच प्रकारच्या भूमिका चपखळ पद्धतीने निभावल्या. सध्या वहिदा चित्रपटसृष्टीपासून लांब असून वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करत त्यांचा दिवस घालवतात.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
देव आनंद अन् सुरैया यांच्या प्रेमात मामाने घातलेला रोडा, अधुऱ्या लव्हस्टोरीचा ‘असा’ झाला वेदनादायक अंत
अर्रर्र! अंकितच्या चुगल्यांचा प्रियांकाने घेतला चिखल फेकून बदला, पाहा व्हायरल व्हिडिओ