Friday, December 8, 2023

देव आनंद अन् सुरैया यांच्या प्रेमात मामाने घातलेला रोडा, अधुऱ्या लव्हस्टोरीचा ‘असा’ झाला वेदनादायक अंत

आयुष्यात प्रत्येकजण कधी ना कधी कोणाच्यातरी प्रेमात पडतो. जगात अशी कित्येक लोक आहेत, ज्याच पहिलं प्रेम अर्धवट राहीले आहे. तरीही याच्या पलीकडे जाऊन विचार करत माणूस दुसर्‍यांदा प्रेमात पडतो. परंतु, असे म्हटले जाते की, पहिलं प्रेम माणूस आयुष्यभर विसरू शकत नाही. मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत. ज्यांनी पहिल्यांदा कोणावर तरी प्रेम केलं आणि लग्न मात्र दुसर्‍याच व्यक्ती बरोबर केले. असे कलाकार मनोरंजन विश्वात भरपूर आहेत. त्यातील एक नाव म्हणजे देव आनंद होय.

जबरदस्त स्टाईल आणि उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते देव आनंद यांची लव्हस्टोरी ((Dev Anand) Love Story) संपूर्ण मनोरंजन विश्वात प्रसिद्ध आहे. त्यांची लव्ह स्टोरी फक्त अपुरीच राहिली नाही, तर तिचा शेवट अत्यंत वेदनादायक झाला. देव आनंद यांची 03 डिसेंबर रोजी पुण्यतिथी असते. चला तर पुण्यतिथीनिमित्त देव आनंद आणि सुरैया (Dev Anand And Suraiya) यांच्या लव्हस्टोरीविषयी जाणून घेऊया…

देव आनंद (Dev Anand) यांचा जन्म 26 सप्टेंबर, 1923 साली झाला होता. अभिनेते देव यांनी 1948 साली ‘जिद्दी’ या चित्रपटात काम केले. यानंतर ते खूप प्रसिद्धीच्या झोतात आले. या चित्रपटामुळे त्यांना चित्रपटसृष्टीत भरघोस यश प्राप्त झाले. देव हे यशाच्या शिखरावर चढत असताना, मनोरंजन विश्वात काम करणार्‍या सुरैया एक दिग्गज कलाकार होत्या. देव यांनी ‘रोमन्सिंग विथ लाईफ’ या आत्मचरित्रात त्यांच्या लव्हस्टोरीविषयी लिहीले आहे. देव यांनी लिहिले की, “काम करत असताना माझी आणि सुरैयाची मैत्री झाली. त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.”

देव हे शूटिंग सेटवर सुरैयासोबत खूप फ्लर्ट करायचे. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले की, “चित्रपट ‘विद्या’च्या सेटवर गाण्याचे शूटिंग सुरू होते. शूटिंग सुरू झाले आणि सुरैयाने मला मिठी मारली आणि त्याच क्षणी मला प्रेमाची जाणीव झाली. मी तिच्या हाताची किस घेतली. त्यानंतर पुन्हा एक फ्लाइंग किस दिली आणि त्याचवेळी सुरैयाने मला प्रेमाची कबुली दिली.” हा शाॅट पूर्ण होताच चित्रपटाचे दिग्दर्शक मोठ्याने ओरडले होते. ते म्हणाले की, “ग्रेट शाॅट.”

माध्यमांतील वृत्तांनुसार, देव यांनी चित्रपटाच्या सेटवर सुरैया यांना प्रपोज केले होते. त्यांनी सुरैया यांना 3 हजार रुपयांची हिर्‍याची अंगठी भेट दिली. परंतू, सुरैया यांच्या मामाला हे नाते मान्य नव्हते. त्यांनी सुरैया यांच्या हातातली अंगठी समुद्रात फेकून दिली आणि त्या दोघांचे हे नाते नाकारले. त्यानंतर सुरैया यांच्या पुढे प्रश्न उभा राहिला. एक तर प्रेम मिळवता येईल? नाहीतर कुटुंबासोबत राहता येईल? याचं उत्तर देताना सुरैया यांनी प्रेमाचा त्याग केला. त्यामुळे त्यांचे प्रेम इथेच थांबले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
अर्रर्र! अंकितच्या चुगल्यांचा प्रियांकाने घेतला चिखल फेकून बदला, पाहा व्हायरल व्हिडिओ
आलियाच नाही तर बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्री लग्नाआधीच झाल्या होत्या प्रेग्नंट, यादी पाहाच

हे देखील वाचा