×

देव आनंद यांच्यावर फिदा असणाऱ्या वहिदा रेहमान त्यांना नेहमीच म्हणायच्या ‘डिसेन्ट इश्कबाज’

जेष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांनी बॉलिवूडवर अनेक दशकं राज्य केले. अतिशय सुंदर आणि प्रतिभावान असलेल्या वहिदा रेहमान यांनी त्यांच्या कलेच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य केले. आज (१४ मे) रोजी वहिदा त्यांचा ८४ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया वहिदा रेहमान यांच्या मनातील देव आनंद यांच्याबद्दल असणाऱ्या भावनांबद्दल.

काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये वहिदा रेहमान यांनी देव आनंद यांना ‘एक डिसेन्ट इश्कबाज’ म्हटले होते. तर एकदा अभिनेत्री ट्विंकल खन्नाशी बोलताना देखील त्यांनी देव आनंद यांच्याबद्दल भरभरून आठवणींना उजाळा दिला होता.

वहिदा रेहमान म्हणाल्या होत्या की, त्या देव आनंद साहेबांच्या खूपच मोठ्या चाहत्या होत्या. त्यांचा पहिला सिनेमा देखील देव आनंद यांच्यासोबतच होता. देव आनंद यांच्याबद्दल बोलतां वहिदा रेहमान यांनी सांगितले की, “जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांनी मला विचारले की, वहिदा कशी आहेस? चल असे करू चाल तसे करू.” मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटली तेव्हा मी त्यांना ‘नमस्ते देव साहेब’ म्हणत त्यांना नमस्कार केला. मग ते मला म्हणाले होते की, मला फक्त ‘देव’ म्हणायचे.

वहिदा रेहमान यांनी देव आनंद यांना ‘डिसेंट इश्कबाज’ म्हटले वहिदा स्वतः देव आनंद यांच्याशी खूपच फ्लर्ट करायचा. त्या देव आनंद यांना नेहमी म्हणायच्या ‘तुम्ही खूपच सुंदर आहात’ एकदा देव आनंद यांनी सांगितले होते की, “मला कोणाची पर्वाच नाही माझे पोट केवळ वहिदा आहेत.”

तत्पूर्वी वहिदा रेहमान या जेवढ्या उत्तम अभिनेत्री होत्या तेवढ्याच उत्तम त्या डान्सर देखील होत्या. त्यांनी त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या डान्सने देखील प्रेक्षकांची मने जिंकली. वहिदा यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी सर्वच प्रकारच्या भूमिका चपखळ पद्धतीने निभावल्या. सध्या वहिदा चित्रपटसृष्टीपासून लांब असून वाईल्ड लाइफ फोटोग्राफी करत त्यांचा दिवस घालवतात.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post