Saturday, June 29, 2024

अमिताभ यांच्या नातीचं इन्स्टाग्राम अकाउंट पब्लिकसाठी ‘ओपन’, पहिल्यांदाच समोर आले खास फोटो

आजच्या सोशल मीडियाच्या जगात फक्त टीव्ही आणि चित्रपटात काम करणारे कलाकारच सेलिब्रिटी असतात असे नाही. सोशल मीडियाने या प्रत्यक्ष कलाकारांसोबत त्यांच्या परिवारातील त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनाही सेलिब्रिटी म्हणून ओळख दिली आहे. कलाकारांइतकीच त्याच्या परिवारातील मंडळींची फॅन फॉलोविंग असते. अशाच एका सोशल मीडिया सेन्सेशनचे नाव म्हणजे नव्या नवेली नंदा. अमिताभ बच्चन यांची नातं म्हणून तिला जेवढी ओळख आहे त्यापेक्षा जास्त ती सोशल मीडिया सेन्सेशन म्हणून ओळखली जाते.

https://www.instagram.com/p/B6rpg01lc74/

https://www.instagram.com/p/BwEyBahF-kW/

https://www.instagram.com/p/BuYf4JxFSKw/

नव्या नवेली नंदा हि अमिताभ बच्चन यांच्या मुलीची म्हणजेच श्वेताची मुलगी आहे. बॉलिवूडमध्ये येण्याआधीच नव्या तरुणांमध्ये लोकप्रिय झाली असून नव्याचे सोशल मीडिया अकाऊंटवर लाखो फॉलवेर्स आहेत.

https://www.instagram.com/p/B6v5o-QlhWf/

नव्याने नुकतेच तिचे इंस्टाग्राम अकाउंट सार्वजनिक केले आहे. २०१७ साली नव्याने इंस्टाग्रामवर अकाऊंट तयार केले. मात्र एवढे वर्ष तिचे हे अकाऊंट फक्त खाजगी होते. म्हणजेच जर कोणाला तिला फॉलो करायचे असेल तर तिला तशी रिक्वेस्ट जायची जर तिने ती रिक्वेस्ट मान्य केली तरच त्या व्यक्तीला तिची संपूर्ण प्रोफाइल दिसायची. मात्र आता नव्याने तिच्या प्रोफाइलची ही सेटिंग बदलली असून आता सर्व लोकं तिची प्रोफाइल बघू शकतात. थोडक्यात नव्याचे अकाऊंट आता सर्वांसाठी खुले झाले आहे. नव्याने अकाऊंटची सेटिंग बदलल्यानंतर तिच्या प्रोफाइल मधून अनेक जुने आणि चांगले फोटो, व्हिडिओ पाहायला मिळत आहे.

https://www.instagram.com/p/B5wklN5l5Ui/

https://www.instagram.com/p/B8TOABblDYo/

https://www.instagram.com/p/B8UBQpmlTAr/

 

नव्याच्या या बदलामुळे तिच्या फॉलोवर्समध्ये झपाट्याने वाढ होत आहे. नव्याने आतापर्यंत १०४ पोस्ट तिच्या अकाऊंटवर टाकल्या असून ती ५८० लोकांना फॉलो करते. नव्याने तिचे आणि बच्चन परिवारसोबतचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या पोस्ट लाइक्स करणाऱ्यांमध्ये अभिषेक बच्चन सोबत अनेक कलाकारांचाही समावेश आहे.

https://www.instagram.com/p/B5g3m-tlAkQ/

https://www.instagram.com/p/B2uNsMzFCN5/

नव्याला बॉलिवूडमधील नीतू कपूर, रणवीर सिंह, सोनम कपूर, कियारा आडवाणी, कनिका कपूर, गौरी खान, सुहाना खान, सोनाली बेंद्रे, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, अथिया शेट्टी, आदर जैन, सारा अली खान, रिद्धिमा कपूर साहनी, आलिया फर्नीचरवाला, अभिषेक बच्चन, वरुण धवन, करीना कपूर खान आदी कलाकार फॉलो करतात. नव्या लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याच्या बातम्या येत आहे. बॉलिवूडमधल्या मोठ्या परिवाराची नातं आणि अभिनयच वारसा मिळालेल्या नव्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला तर त्यात आश्चर्य वाटायला नको.

हे देखील वाचा