Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड कॅटरिनाचे नाव घेत ‘किंग’ कोहलीने सांगितला आपल्या आयुष्यातील मैदानाबाहेरचा सर्वात मोठा क्षण, म्हणाला…

कॅटरिनाचे नाव घेत ‘किंग’ कोहलीने सांगितला आपल्या आयुष्यातील मैदानाबाहेरचा सर्वात मोठा क्षण, म्हणाला…

जगभरातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी२० लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला शुक्रवारपासून (९ एप्रिल) सुरुवात झाली आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी क्रिकेटपटू विराट कोहलीचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो अभिनेत्री कॅटरिना कैफबद्दल बोलताना दिसत आहे.

विराट कोहली आज क्रिकेट जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. जगभरात त्याचे लाखो चाहते आहेत. त्याचबरोबर अनुष्का शर्माशी लग्नानंतर त्याचा बॉलिवूडशी संबंध आणखी घट्ट झाला आहे. पण एक वेळ अशी होती की, विराट कोहलीला मैदानाबाहेरचा सर्वात मोठा क्षण कॅटरिना कैफशी दोन मिनिटं बोलणे हा होता. विराटचा हा मजेदार व्हिडिओ कॅटरिनाच्या फॅन पेजने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, जो बराच वर्ष जुना आहे.

व्हिडिओमध्ये अँकर वाणीने जे तरुण विराट ला विचारले की, त्याचा सर्वात मोठा ऑफ फील्ड क्षण कोणता आहे? यावर विराट म्हणतो, ‘ऑफ फील्ड? कॅटरिना कैफने माझ्याशी पूर्ण दोन मिनिटे गप्पा मारल्या. हा माझ्यासाठी सर्वात मोठा क्षण आहे.’ यानंतर विराट हसायला लागतो. वीणा म्हणाली, ‘खरंच!’ यावर विराट म्हणतो, ‘मी का खोटे बोलणार?’ कॅटरिना कैफला बोलण्याचा सर्वात मोठा क्षण मानणाऱ्या विराट कोहलीचे अनुष्का शर्माशी २०१७ साली लग्न झाल्यानंतर बॉलिवूडशी नाते जोडले गेले.

यावर्षी जानेवारीत विराट आणि अनुष्का वामिकाचे पालक बनले आहेत. विराट आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार आहे. कॅटरिनाविषयी बोलायचे झाले, तर ती ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. 30 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. कोव्हिड- १९ च्या वाढत्या घटनांमुळे त्या चित्रपटाला पुढे ढकलण्यात आले आहे. नुकतेच कॅटरिना कैफलही कोरोना पॉझिटिव्ह आढळली असून, ती घरीच उपचार घेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लहान मुलांना बर्गर वाटून तरुणाने जिंकली सर्वांची मने, ‘बारिश की जाए’ गाण्यावरही लावले ठुमके; गायक बी प्राककडून व्हिडिओ शेअर

-‘ब्रोकन बट ब्युटीफुल!’ सिद्धार्थ शुक्लाच्या किसिंग सीनला चाहत्यांची पसंती; मात्र शहनाजचे चाहते झाले निराश

-‘मी परफेक्ट नाहीये’, लूकबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर अनुष्काने दिले होते प्रत्युत्तर

हे देखील वाचा