Tuesday, March 5, 2024

Republic Day 2024 | कोणत्याही देशभक्ताने न चुकता पाहायलाच हव्यात अशा पाच हिंदी वेबसिरीज

टीव्ही आणि चित्रपटांशिवाय ओटीटी व्यूअरशिपही दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषत: लॉकडाऊन दरम्यान शूट करण्यात आलेल्या अपयशामुळे या मालिकांचे नवीन भाग प्रसारित होऊ शकले नाहीत, तर चित्रपटगृहेही बंद होती. अशा परिस्थितीत ओटीटी हा एकमेव पर्याय होता जिथे नवीन कंटेट लोकांना मिळायचा. गेल्या काही वर्षातील ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सिरीजवर नजर टाकल्यास सहज लक्षात येईल की देशभक्तीवर आधारित अनेक वेब सिरीज प्रसिद्ध झाल्या आहेत. मंगळवारी आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला. त्याचनिमीत्ताने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत देशभक्तीची भावना जाग्या करणाऱ्या सर्वोत्कृष्ट पाच वेब सिरीजबद्दल आपण आज जाणून घेऊयात.

द टेस्ट केस
अल्ट बालाजीच्या या सिरीजमध्ये निम्रत कौर, अक्षय ओबेरॉय, राहुल देव, अतुल कुलकर्णी आणि अनुप सोनी हे मुख्य भूमिकेत दिसले. याशिवाय जुही चावलाचाही एक कॅमिओ रोल आहे. ‘द टेस्ट केस’ सिरीजचे दिग्दर्शन नागेश कुकनूर आणि विनय वैकुल यांनी केले आहे. याची कहाणी कॅप्टन शिखा शर्माच्या आसपास फिरत आहे. महिला सैनिक म्हणून पुरुषांचे वर्चस्व असलेल्या जगात आपली ओळख निर्माण करण्याचा तिचा संघर्ष आपल्याला यात दिसतो.

द फॉरगॉटन आर्मी: आजादी के लिये
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सैन्याच्या दृष्टीने चित्रीकरण करण्यात आलेल्या या वेब सिरीजमध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेली धडपड पाहून अंगावर शहारे येतात. याचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. सनी कौशल, शर्वरी, रोहित चौधरी आणि टी जे भानू यांच्यासह अन्य कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

बोस डेड/अलाइव
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित या सिरीजमध्ये राजकुमार रावने नेताजींची भूमिका साकारली आहे. यात नेताजींच्या तारुण्यापासून ते त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यापर्यंतच्या सर्व घटनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच त्यांच्या मृत्यूचे कारणाचे समाजासमोर न आलेल्या पैलूंवरही यात काही गोष्टी दाखविण्यात आल्या आहेत. याचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले आहे.

द फॅमिली मॅन
मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत असलेल्या या सिरीजला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या सिरीजमध्ये एका जासूसची कहाणी दाखवली आहे. ज्यामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबाच्या समस्यांना सामोरे जाताना करण्यात येणार्‍या कामाची धडपड दाखवली आहे. या सिरीजचे दिग्दर्शन राज आणि डी के यांनी केले आहे. यामध्ये मनोज वाजपेयी यांच्यासह प्रियामनी, शरीब हाश्मी, नीरज माधव, शरद केळकर आणि गुल पनाग मुख्य भूमिकेत आहेत.

हे देखील वाचा