Monday, October 13, 2025
Home वेबसिरीज चाहत्यांची प्रतीक्षा संपली! सुनील शेट्टीच्या ‘धारावी बँक’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

चाहत्यांची प्रतीक्षा संपली! सुनील शेट्टीच्या ‘धारावी बँक’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

कोविड काळानंतर ओटीटीवरील कंटेंट बघणाऱ्या लोकांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. असाच एक उत्तम आणि परवडणारा ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे एमएक्स प्लेअर. आता अशीच आणखी एक आगामी सीरिज या प्लॅटफॉर्मवर लवकरच येणार आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या ‘धारावी बँक’ या वेबसीरिजचा टीझर नुकताचा प्रदर्शित झाला होता. आता याचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमधून धारावीमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी उलगडणार आहे.

अभिनेता सुनील शेट्टी(Suneil Shetty) या सीरिजच्या माध्यमातून ओटीटी विश्वात पदार्पण करत आहे. गुन्हेगारी विश्वाचा सर्वेसर्वा ‘थलाईवन’ हे पात्र सुनील शेट्टीने साकारलं आहे. याबरोबरच विवेक ओबेरॉयसुद्धा यामध्ये जेसीपी जयंत गावस्कर या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. चोर पोलिसाचा हा खेळ धारावीच्या गुन्हेगारी विश्वाच्या कार्यप्रणालीवर प्रकाश टाकणार असल्याचं स्पष्ट होत आहे. शिवाय सोनाली कुलकर्णी, संतोष जुवेकर, नागेश भोसले, चिन्मय मांडलेकरसारखे मराठी कलाकारही यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 19 नोव्हेंबरला ही वेबसीरिज एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून ज्या धारावीकडे पाहिलं जातं तिथे आत नेमकी काय काय रहस्यं दडली आहेत हे या वेबसीरिजमधून आपल्याला पाहायला मिळणार आहे. झोपडपट्टी हे गुन्हेगारांचं मोक्याचं ठिकाण असतं आणि नेमकं तेच हेरून समीत कक्कड यांनी एक उत्तम क्राइम थ्रिलर प्रेक्षकांसमोर आणल्याचं ट्रेलरमधून जाणवतंय. ट्रेलरमध्ये, धारावीच्या भिंतींमध्ये वाढणाऱ्या एका मोठ्या गुन्ह्याच्या संबंधाची झलक आपल्याला पाहायला मिळते. धारावीच्या त्या 30 हजार गल्ल्यांमध्ये दडवलेले 30 हजार कोटी रुपयांचे आर्थिक साम्राज्य शोधण्यासाठी पोलिस बाहेर पडतात आणि थलायवनला संपवायचे असते. त्यात कुटुंब, सन्मान, सत्ता आणि कर्तव्य यासाठीचा लढाही दाखवण्यात आला आहे.

या वेबसीरिज थलायवनच्या व्यक्तिरेखेबद्दल सुनील शेट्टी म्हणाला, “माझा विश्वास आहे की आदर मिळायला हवा आणि थलायवन हे कसे केले जाते याचे खरे रूप आहे. तो शक्तिशाली आणि निर्दयी आहे पण धारावीत राहणाऱ्या लोकांना तो आपले कुटुंब मानतो. आणि थलायवनने माझ्यासाठी परिपूर्ण डिजिटल पदार्पण केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पायल रोहतगी घेऊ शकत नाही मातृत्वाचा आनंद, तर ‘या’ कारणामुळे डॉक्टर देत नाही सरोगसी करण्यास मान्यता
प्रियांकाने घेतला गावातील शाळेचा आढावा; म्हणाली, ‘बदलाची सुरुवात लहानपणापासून व्हायला हवी’

हे देखील वाचा