Saturday, June 29, 2024

‘मिसमॅच्ड’ फेम रोहित सराफच्या मागे धावल्या मुली, चाहत्यांपासून जीव वाचवत कलाकारांनी ठाेकली धूम

मिसमॅच्ड‘ या वेब शोचा दुसरा सीझन आला आहे. या मालिकेतील मुख्य नायक रोहित सराफला ‘ऋषी’च्या भूमिकेत प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. विशेषत: मुली रोहितच्या कामाने खूप प्रभावित झाल्या आहेत. मुलींमध्ये रोहितची फॅन फॉलोइंग जबरदस्त वाढली आहे. नुकताच रोहितचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये चाहत्यांनी त्याला घेरले आहे आणि रोहित तिथून पळत आहे.

राेहितने केले ‘विक्रम वेध’ चित्रपटात काम
रोहित (rohit saraf) याने यापूर्वी वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समधून आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. नुकताच तो ‘विक्रम वेध’ या चित्रपटातही दिसला होता. यासोबतच ‘मिसमॅच्ड’ या वेब शोमध्ये त्याला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. पहिल्या सीझनमध्ये ऋषीची व्यक्तिरेखा लोकांना आवडली होती. आता दुसऱ्या सीझनलाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

रोहित सराफला घेरले मुलींनी 
रोहितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहितला त्याच्या चाहत्यांनी घेरले आहे. गर्दी पाहून रोहित अस्वस्थ झाला आणि बाहेरचा रस्ता शाेधत तेथुन पळून गेला. त्यांना धावताना पाहून मुलीही त्यांच्या मागे धावत सुटल्या, पण त्या राेहितला पकडण्यास अयशस्वी ठरल्या. हा व्हिडिओ साेशल मीडियावर जबरदस्त व्हायरल हाेत आहे. या व्हिडिओवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.

रोहितला रोमँटिक भूमिका करायला आवडतात
रोहित सराफचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. रोहितने फार कमी वेळातच आपले अनेक चाहते बनवले आहेत. रोहित म्हणतो की, “त्याला रोमँटिक भूमिका करायला आवडते. त्याच्या मते, त्याला सर्व प्रकारची पात्रे करायची आहेत जेणेकरून तो एक अभिनेता म्हणून विकसित हाेऊ शकेल.” ‘मिसमॅच्ड’मध्ये रोहित व्यतिरिक्त प्राजक्ता कोळी मुख्य भूमिकेत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
अरे व्वा! ऑक्टोबरमध्ये पार पडणार ‘ही’ सौंदर्य स्पर्धा, अंतिम सोहळ्याला करिश्माही लावणार हजेरीआतुरता संपली! ‘मनिके’ गाण्याचं हिंदी व्हर्जन रिलीज, सिद्धार्थ अन् नाेरावर काैतुकाचा वर्षाव

हे देखील वाचा